एका ओळीत मुळाक्षरांची [ अक्षरसंख्या] संख्या जी आहे तीच इतर ओळींमधे असायला हवी. .
✒️ लेखन नियम :-
अ ) लेखन चार ओळीतच असावे.ही शेल चारोळी म्हटली जाते.
ब ) चार-चार ओळींचे दोन,तीन,गट केल्यास ते शेलकाव्य म्हटले जाते.
१ ) ओळीत अक्षरसंख्या किती असावी.याला बंधन नाही.पण...मला वाटते दहा सोळा-सतरा अक्षरे योग्य ठरतात.
२ ) पहिल्या ओळीत आलेली अक्षरसंख्या ही उर्वरित तीनही ओळीत सारखीच असावी.म्हणजेच चारही ओळीत समान अक्षरसंख्या यावी.
३ ) शब्दसंख्येचे बंधन नाही.पण एक ते चार ओळीत अक्षरसंख्या समसमान असावी.
४ ) पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द हा दुसऱ्या ओळीची सुरूवात असावा .
५) दुस-या ओळीच्या शेवटच्या शब्दाने तिसऱ्या ओळींची सुरुवात नसावी.
६ ) तिसरी ओळ स्वतंत्र सुरुवात असावी.
७ ) तिसऱ्या ओळीच्या शेवटच्या शब्दानेच चौथ्या ओळीची सुरुवात करावी.
८) यमक हे दुसऱ्या ओळीच्या शेवटी व चौथ्या ओळीच्या शेवटी जुळविला असावा.
९ ) चारही ओळी ह्या परस्परांना अर्थदृष्ट्या पुरक असाव्यात.
उदा. शेल चारोळी
✒️ आपण दोघे
सखी,ती वेळ पुन्हा परत यावी [अक्षरे - १२]
यावी घेऊन पुन्हा त्या आठवणी [अक्षरे - १२]
आठवणींच्या झोक्यावर असावे [अक्षरे - १२]
असावे आपण दोघे नको भीती [अक्षरे - १२]
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
उदा. शेलकाव्य
नात्याची विण
उसवू नको ग तू नात्याची विण [अक्षरे - १२ ]
विण पुन्हा तशी जुळणार नाही [अक्षरे - १२ ]
तू उगाच नको वाढवूस वाद. [अक्षरे - १२ ]
वाद हा विनाशाचे कारण होई. [अक्षरे - १२ ]
नाते मिळत नाही कुठे बाजारी [अक्षरे - १२ ]
बाजारी नात्याला नसतेच नाव [अक्षरे - १२ ]
विण असू द्यावी फिट्ट आणि घट्ट [अक्षरे - १२ ]
घट्ट विणीत नक्की गावतो गाव [अक्षरे - १२ ]
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
खुपच छान माहिती दिली आहे... ✍️✍️
उत्तर द्याहटवामी नक्की प्रयत्न करेन ...🙏🏼🙏🏼
वाहहह...खचप सुंदर मार्गदर्शन सर... धन्यवाद...🙏😊
उत्तर द्याहटवावा! अप्रतिम मार्गदर्शन सर, मराठी लेखनात भर पडली 👌👌👍👍
उत्तर द्याहटवाविजय बोरदे
Khup chaan mahiti dili sir...👍👌✍️🍫
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती दिली सर👌👌👌
उत्तर द्याहटवा