Kaayguru.Marathi

शुक्रवार, नोव्हेंबर ०५, २०२१

त्या वळणावर

त्या वळणावर ! 


आपणच   गावे  आपुले  गाणे
कधी एकटे कधी सारे मिळूनी
झाले  गेले   विसरुन जावे
क्षणभर एका वळणावरती

कधी हसावे कधी फुलावे
स्वप्नात आपुल्या आपण फिरावे
विसरुन जावे दुःख ते सारे
क्षणभर एका वळणावरती

कधी उजेड कधी काळोखराती
कधी  न  स्मरावी  काजळवाती
थांबून  गावी  जीवनगाणी
क्षणभर एका वळणावरती

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

२४ टिप्पण्या:

  1. क्षणभर एक वळणावर्ती..... अतिशय सुंदर ओळ👍👍👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. वा! छान वर्णन सर, जिवनाचे वर्णन सकारात्मक दृष्टिकोनातून मांडले👍👍👌👌
    विजय बोरदे

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...