आई गोष्ट नको सांगू मला जाड्या रड्याची
ऐकेन मी गोष्ट आज चिऊ काऊची
चिवचिव करुन जागवाया ती दिसेना चिऊ
तिच्याविना एकटा मी कसा ग् राहू
हुरहूर लागली मला तिच्या भेटीची
ऐकेन मी गोष्ट आज चिऊ काऊची… ।।१।।
पहिला घास माझ्यासवे ग् खातो तो काऊ
त्याचाविना एकटा मी कसा ग् जेवू
शिकवि कला तो मज ख-या खोट्याची
ऐकेन मी गोष्ट आज चिऊ काऊची...।।२।।
आई चिऊ वाटे ताऊ अन् भाऊ वाटे काऊ
आम्ही तिघे नाचू गाऊ सोबत राहू
तिघे सोबतीला शोभा वाढवू अंगणाची
ऐकेन मी गोष्ट आज चिऊ काऊची...।।३।।
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अतिशय सुंदर अंगाई👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर 👌👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर रचना
उत्तर द्याहटवाखुप सुंदर विचार
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवावाहह... खुप सुंदर रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाव्वा व्वा खूपच अप्रतिम अंगाई गीत सरजी ✍️✍️🌟🌟🌟🌟🌟
उत्तर द्याहटवाछान अंगाई गीत सर👌👌👌
उत्तर द्याहटवाविजय बोरदे
खूप सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवा