प्रिय बाबा...!
बाबा, मी सासरी आल्यापासून ते आजपर्यंत एकही क्षण तुमच्या आठवणीवाचून गेला नाही...
रोज पहाटे लवकर उठतांना तुम्ही मला आठवता….
तुम्ही आईला नेहमी म्हणायचे, अग.. झोपू दे! हे काय सासर आहे का लवकर उठाया?
रोज पहाटेपासून उठल्यावर घरातील सगळ्याचं हवं नको ते करतांना दमछाक होताच बाबा तुम्ही आठवता…
माझ्याकडे कामाचा तगादा लावणा-या आईला तुम्ही म्हणत, अग, किती काम करुन घेशील तिच्याकडून..?
ती काय यंत्र आहे का एकसारखं काम करायला? बस्स. पुरे आता!
स्वयंपाकघरात गेल्यावर बाबा तुम्ही आईशी केलेला संवाद आठवू लागतो…
अग, तूच कर ना आज स्वयंपाक. सासरी गेली का आपली ताऊ करणारच आहे सासरच्यांसाठी सुगरणीचा स्वयंपाक..!
दिवसभराच्या रांधा वाढा उष्टी काढा करुन उशिरा झोपतांना तुम्ही डोळ्यासमोर उभे राहता...
अरे, बेटा! झोपली नाही अजून. बरीच रात्र झाली; झोप आता. उशिरा झोपणे प्रकृतीसाठी योग्य नाही बरे!
रात्री झोपतांना अंगावर पांघरुन घ्यायलाही त्राण नसतांना बाबा तुम्ही आठवता...
काळजीने मी झोपले की नाही हे पाहण्यासाठी आले असता... किती वेडी पोर ही.. एवढ्या थंडीतही पांघरुन न घेताच झोपली.. अन् स्वतःचे पांघरुन माझ्या अंगावर घालणारे तुम्ही ..!
बाबा, अंगात तापाची कणकण येताच तुमच्या मायेची ऊब आठवते...
अरे, आज आमचं वेडं फूल कसं हिरमुसले? अरेरे.. ताऊला तर ताप चढलाय. चला, चला..! उशिर नको. डॉक्टरांकडे लवकर जाऊ या. अंगावर ताप मिरवणे आरोग्यासाठी चांगले नाही बेटी !
बाबा, सासरी आल्यापासून हे सारं काही आठवतं हो.. पण त्या आठवण्याला सुगंध असतो तुमच्या मायेचा अन् आंतरिक जिव्हाळ्याचा..!
तुम्हाला माझी असणारी काळजी मला जगण्यासाठीचे हे बळ... म्हणजे अमृतसंजीवनी हो बाबा!
लेक… बापासाठी वडाचा पार !
लेक… बापाच्या सुखाचं सार !
लेकीवर जीवापाड प्रेम करणा-या सर्व बाबांना समर्पित...!
©प्रा.पुरूषोत्तम पटेल " पुष्प "
अतिशय भावस्पर्शी पत्रलेखन केले सरजी ✍️✍️🌟🌟🌟
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर लेखन.... 👌👌🙏🏼🙏🏼✍️✍️
उत्तर द्याहटवावाहह... खुप सुंदर ह्रदयस्पर्शी रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवासुंदर 👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर लेखन👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाबहुत खूब
उत्तर द्याहटवाSuper Sirji 👌👌
उत्तर द्याहटवासुंदर
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर पत्र सर
उत्तर द्याहटवाछान!
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर भावस्पर्शी लिखाण सर जी👍👍👍👌👌👌
उत्तर द्याहटवाVery nice Letter Kakaji
उत्तर द्याहटवाहृदय स्पर्शी , मनाला भावलेले सुंदर लेखन सर👌👌👌
उत्तर द्याहटवालेक माझी मोलाची
विजय बोरदे