🌹 जय श्रीराम !✍️
लक्ष्मण हे प्रभू रामाचे संपूर्ण अवतार कार्यात सदोदित सावली बनून सोबत राहिले.त्यांच्या त्यागाला सीमा नाही.रामकथा लक्ष्मणाशिवाय पुर्णच होऊ शकत नाही.ते आपण आज जाणून घेऊ या---
राम-रावण युद्धानंतर श्रीराम अगस्त्य ऋषींना म्हणाले,
" की आम्ही रावण आणि कुंभकर्ण ह्या शक्तीशाली वीरांचा वध आणि लक्ष्मणाने रावणपुत्र इंद्रजीत आणि अतिकाय या दोन्ही असूरांचे निर्दालन केले."
त्यावर ऋषी अगत्स्य म्हणाले," श्रीरामा, रावण आणि कुंभकर्ण हे महाशूर होते.पण त्याच्याहून ही महाशक्तीशाली तर इंद्रजीत होता.त्याने प्रत्यक्ष इंद्राला जिंकून घेतले होते.अशा या महाविराचा वध लक्ष्मणाने केला हा पराक्रम साधा नव्हे ! म्हणून लक्ष्मण हे अतिशुर योद्धा होत ." हे ऐंकूण श्रीरामांना आश्चर्य वाटले खरे , पण प्रिय भावाची स्तुती ऐंकूण त्या़ंना मनोमन आनंदही झाला.पण तरी त्यांच्या मनात निर्माण झालेल्या कुतूहलाने उचल खाल्लीच !
ते विचार करु लागले की, " ऋषी अगत्स्य का म्हणाले की,इंद्रजीतला मारणे हे रावणापेक्षाही महाकठीण होते ? "
त्यांच्या शंकेला उत्तर देताना ऋषी अगत्स्य म्हणाले,
" श्रीरामा , इंद्रजीताला असे वरदान होते की त्याचा वध असा माणूस करेल की ज्याने..." ते क्षणभर थांबले.
" बोला ऋषीवर,कोणते वरदान ? आणि कोणता माणूस ? " श्रीराम असे म्हणताच ऋषी अगत्स्य म्हणाले ,
" श्रीरामा , इंद्रजीताचा वध तोच माणूस करु शकणार होता जो...
१) चौदा वर्षांत ज्याने पळभरही झोप घेतली नसेल.
२) चौदा वर्षांत ज्याने एक क्षणही स्रीमुखाचे दर्शन घेतले नसेल.
३) चौदा वर्षांत एकही घास जो जेवला नसेल. "
श्रीराम म्हणाले, " ऋषीवर हे कसे शक्य आहे.
वनवासात असताना मी नियमित लक्ष्मणाला त्यांच्या वाट्याची,हिश्याची फळे देत होतो.
दुसरी बाब , मी व सीता एका कुटीतच राहत होतो,
आणि जवळच दुस-या पर्णकुटीत लक्ष्मण राहत असे.
त्याने सीतेचे मुखदर्शन घेतले नसावे हे शक्यच नाही.
तिसरी गोष्ट,लक्ष्मण चौदा वर्ष झोपलाच नाही हे कसे शक्य आहे.मला हे अशक्य वाटत आहे ."
श्रीरामांनी सांगितलेली गोष्ट ऐकताच ऋषी अगत्स्यांनी स्मित हास्य करीत श्रीरामांच्या मनातील गोष्ट अंर्तज्ञानाने जाणून घेतली.रामाचे गुणगान तर सप्तखंडात होत होते.पण लक्ष्मणाचा त्याग आणि तप व बंधुप्रेमाची चर्चा अयोध्येतील घराघरात व्हावी असे श्रीरामांनाही वाटत होतेच!
ऋषी अगत्स्य म्हणाले , " श्रीरामा,आपण ह्या गोष्टी लक्ष्मणाकडूनच जाणून घेतल्या तर...? "
लक्ष्मणजीला बोलावण्यात आले, त्यांना सांगण्यात आले की, तुम्हाला जे विचारण्यात येईल,त्याचे उत्तर खरेखुरे असेच द्यावे !
श्रीरामांनी विचारले, " लक्ष्मणा ,
१) आपण तीघेही चौदा वर्ष वनवासात सोबत राहिलो असता,तू तुझ्या वहिनीचे मुख बघितले नाही का ?
२) तुला तुझ्या वाट्याची फुले-फळे मी दररोज आहारासाठी दिली तरी ती तू का खाल्ली नाहीस ?
३) आणि तू १४ वर्ष का झोप घेतली नाहीस ?
तुला हे कसे काय शक्य झाले ? ते सांग ! "
श्रीरामांनी विचारलेल्या तीनही प्रश्नाला विनम्रतेने उत्तर देत लक्ष्मणजी म्हणाले,
" हे प्रभो,
✍️ तुम्हाला आठवत असावे की,जेव्हा वहिनींच्या शोधात फिरत असता आपण ऋष्यमुख पर्वतावर पोहोचलो तेव्हा सुग्रीवाने काही दागिने दाखवून त्यावरुन ओळख पटविण्याचे सांगितले.तेव्हा मी फक्त वहिनीच्या पैंजणाशिवाय दुसरे कोणतेही दागिने ओळखू शकत नसल्याचे बोललो होतो.कारण मी माझ्या वहिनीच्या चरणाव्यतिरिक्त तिला बघितलेच नाही.
✍️* चौदा वर्ष मी भोजन न करता कसा राहिलो तर..तुम्ही मला माझ्या वाट्याचे फुलं-फळ देतांना " हा ठेव तुझा वाटा ! " असे म्हणून मला नियमित देत होते.तुम्ही मला " तू हे खाऊन घे ! " असे कधी म्हटलेच नाही.तुमची आज्ञा नसल्याने मी भोजन कसा घेऊ !
तुम्ही दिलेले ते फुलं-फळ मी सर्व सांभाळून ठेवली आहे . ते सर्व आताही पर्णकुटीत पडूनच आहेत.
लक्ष्मणजी चित्रकुट पर्वतावरील पर्णकुटीत जाऊन फूलं-फळांची टोपले उचलून घेऊन आले.ती श्रीरामांसमोर ठेवली.ती फळे मोजण्यात आली.त्यात सात दिवसांची फळे कमी भरली.तेव्हा श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, " ज्याअर्थी सात दिवसाची फळे कमी भरताहेत.त्याअर्थी हे लक्ष्मणा,तू निदान सात दिवस तरी जेवलाच आहेस की ! "
त्याचाही हिशेब देत लक्ष्मणजी म्हणाले,
✍️" हे प्रभो,
मला पुढील सात दिवस फूल-फळं मिळालीच नाहीत . ते सात दिवस असे-
१) ज्या दिवशी आपणास पिताश्रीच्या स्वर्गवासाचा शोकसंदेश मिळाला,त्या दिवशी आपण निराहारी म्हणजेच काहीच न खाता राहिलो.
२) ज्या दिवशी रावणाने मातासितेचे हरण केले त्या दिवशी आपण शोकमग्न होऊन मातेच्या शोध घेत राहिलो. फळे आणावयास कोण जाणार तो दिवस आपण निराहार काढला.
३) ज्या दिवशी तुम्ही समुद्रदेवाला प्रार्थना करुन त्यांची संमती मागीत होता.तो एक दिवस.
४) ज्या दिवशी तुम्ही इंद्रजीताच्या नागपाशात बांधले गेल्याने मुर्छित पडून राहिले.तो दिवस निराहार होता.
५) ज्या दिवशी इंद्रजीताने मायावी सितेला कापल्याने आपण सर्व शोकमग्न होतो.तो दिवस निराहारी गेला.
६) ज्या दिवशी रावणाने मला शक्तीने मारले.तो दिवस सगळेच निराहार राहिले.
७) ज्या दिवशी तुम्ही स्वतः रावण वध केला.त्या शोकात आपण निराहारी राहिले.
प्रभो,भ्राता...ह्या सात दिवशी आपणास वा इतर कोणासही जेवण्याची इच्छा तरी होती काय ? आणि हो , गुरुदेव विश्वामित्रांकडून मला एक दिव्य विद्या प्राप्त झाली होती.ती म्हणजे ' काहीही न खाता जीवंत राहण्याची विद्या ! '
त्याच विद्येच्या बळावर मी चौदा वर्ष माझ्या भूखेवर नियंत्रण ठेवू शकलो.
✍️ तिसरी गोष्ट म्हणजे मी चौदा वर्ष झोपच घेतली नाही ते कसे...ते सांगतो ,
तर,तुम्ही आणि वहिनी एका पर्णकुटीत विश्रांती घेत.मी मात्र बाहेर थांबून रात्रभर माझ्या धनुष्याला बाण चढवून डोळ्यांची पापणी लवू न देता जागता पाहरा करीत असे.चौदा वर्षाच्या काळात मी निद्रेला माझ्या बाणांनी बांधून ठेवले होते.निद्रेने शेवटी हार मानून मला वचन दिले होते की,चौदा वर्ष ती मला स्पर्शही करणार नाही.
पण भ्राताश्री,तुम्हाला स्मरत असेल तर,तुमच्या राज्याभिषेक होत असता माझा हातून छत्र खाली पडले होते.कारण तेव्हा मला निद्रेच्या स्पर्श झाला होता. ह्या कठोर तपामुळेच आणि संयमामुळेच मी इंद्रजीतास ठार करु शकलो.
प्रभू श्रीरामांनी लक्ष्मणजीची कठोर व संकल्पित निष्ठा ऐंकूण त्यांना हृदयासी लावले.
🙏🙏🙏🌹धन्य ते लक्ष्मणजी! 🌹🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹धन्य ते बंधुप्रेम !🌹🙏🙏🙏
🙏🌹🙏ॐ लं लक्ष्मण देवताभ्यो नमः:🙏🌹🙏
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
खूप छान सरजी
उत्तर द्याहटवामन:पूर्वक आभार सरजी!🙏
हटवा🙏🙏🙏 धन्य ते बंधुप्रेम
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद!🙏
हटवाखुप सुंदर 👌
उत्तर द्याहटवामनापासून कौतुक 👌 सुंदर समिक्षा!🌹
हटवाखूप खूप मस्त लेख
उत्तर द्याहटवामनापासून आभार सरजी!🙏
हटवाफारच सुंदर लेख 👍👍👌👌
उत्तर द्याहटवाआभारी सरजी 🙏
हटवासरजी,बंधुप्रेमाचे आणि नैतिक आचरणाचे अप्रतिम आदर्श विचारधारा!👌👌👌
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद!🙏
हटवाखूप सुंदर वाचनीय लेख.
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी 🙏
हटवाखूपच सुंदर लेख
उत्तर द्याहटवाआभारी सरजी!🙏
हटवासंस्कार क्षम लेख सर, आजच्या या वातावरणात बंधुप्रेमाची दखल घेण्यासाठी उल्लेखनीय अशी कथा 👌👌
उत्तर द्याहटवाविजय बोरदे
धन्यवाद जी!🙏
हटवाअप्रतिम 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम 🙏
हटवावाहह..खुप सुंदर आध्यात्मीक ज्ञान वाढवणारा , अप्रतीम, ह्रदयस्पर्शी लेख...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवाआभारी मॅडम!🙏
उत्तर द्याहटवा