बरीच खलबतं झाली होती
संपल्या कितीतरी दिवस रात्री
पण त्यांना यश येत नव्हतं हाती !
आजही आठवतात मला ती
दुराचारी हो फक्त सात डोकी
त्यांना पाहून वाटते आहे जगी
धृतराष्ट्र दुर्योधन ह्या भूलोकी
ते नव्हते घरचे होते मला परके
गड्या मी मानले त्यांना आपले
कृतघ्न त्या शिरी चढवता मुकूट
मुखवट्यातील रुप मज कळले
बापच नव्हता त्यांना माहित हो
मीच दिधले की ओळखीचे नाव
दाखला तयार होताच सगळेच
विसरुन गेले आपुलकीचा गाव
कफल्लक होते तरी मी त्यांना
स्वबुद्धी केले प्रधान अन् राजा
अधम असूर ते खरे! नव्हते सूर
केसाने कापून गळा दिली सजा
म्हणे पुरुषोत्तम ! घ्या हे ध्यानी
मानव असेल तर तो मेळवावा
निर्बुद्ध , कपटी शकुनी वृत्तीला
सुर आपुला कधी ना आळवावा
ऐका माझा मंत्र उघडे ठेवा कान
अधमांचा गळा घालू नका माळा
उपकाराची ते ठेवत नाही जाण
कृतघ्न हो ते नका लावू लळा
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अप्रतिम सुंदर रचना सर
उत्तर द्याहटवाछानच 👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाVery nice sir
उत्तर द्याहटवासुंदर 👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना केली सर ✍️✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाअगदी बरोबर योग्यच उपमा
उत्तर द्याहटवाअतिशय उत्तम काव्यरचना केली सरजी अप्रतिम ✍️👌👌👌👌
उत्तर द्याहटवाKhupch sunder rachna 👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर👌👌👌👌 🙏🙏
उत्तर द्याहटवाव्वा.!फारच सुंदर रचना👍👍👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर सरजी👍👍
उत्तर द्याहटवा