तुला लाविला मी लळा
माणसांचा जमवला गोतावळा
सोसिल्या अनंत कळा
विश्वासघाती लोकांनी
केसाने कापला गळा
असह्य झाल्या झळा
" त्यांना " सुख द्यायला
प्राजक्त झालो मी !
मनसोक्त बहरलो
नाजूक श्वेत पुष्पानी
स्नेहाचा परिमळ
राखून न ठेवता
वाटतच सुटलो...
वा-याच्या अश्वावर
स्वार होऊन !
सुगंध घेऊन मात्र...
बहुतेकांनी तुडवले
पायदळी...!
छिन्न विछिन्न
रक्तरंग होईतो !
वाटलं...
स्वतःच्या आयुष्याचे
गणित सोडवताना
उगीच करीत राहीलो मी
स्वतःच्या जगण्याचा भागाकार
आणि इतरांचे गणित
सोडवताना मात्र ... मी
करीत गेलो गुणाकार!
शेवटी आयुष्याला
आकार देतांना
सांधताना बांधताना...
साधलं काहीच नाही
पण...अनुभवला मी
माझ्याच दुख-या मनाचा
भागाकार !!!
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवामनापासून आभार रंजुजी!
हटवाअप्रतिम सुंदर सर
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवामनापासून आभार सरजी!🙏🙏🙏
हटवामन:पूर्वक आभार सरजी!🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाKhupach chan
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद जी!🙏🙏🙏
हटवाखूप खूप सुंदर सर
उत्तर द्याहटवादेवेंद्र जी, मनापासून आभार!🙏🙏🙏
हटवाअतिशय सुंदर लिहलय सर
उत्तर द्याहटवाधन्यवाद जी!🙏🙏🙏
हटवाअप्रतिम रचनाविष्कार सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवामॅडम जी,मन:पूर्वक आभार!🙏🙏🙏
हटवाअतिशय सुंदर रचना केली सर 👌👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवामनापासून आभार मॅडमजी!🙏🙏🙏
हटवाखूप खूप मनापासून आभार सरजी!🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर लेखन सर जी💐💐👌👌👍👍
उत्तर द्याहटवामनापासून आभार सरजी!🙏🙏🙏
हटवाअप्रतिम कविता सरजी!👌👌🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाछान,छा गये सरजी
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर
उत्तर द्याहटवाअप्रतिम कविता सरजी 👍👌👌💐
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर कविता सर, जीवनाचा सुंदर विचार मांडला आहे.
उत्तर द्याहटवाअप्रतिम काव्यरचना
उत्तर द्याहटवा