कुंजविहारी तू। गिरीधारी ।।
देवकी नंदन । पितांबरधारी।
बन्सीबिहारी तू ! मनोहारी ।।
कालियामर्दक । गोपालसखा तू ।
नंदनंदन तू । वासुदेव ।।
राधारमण तू । मनमोहन तू
माखनचोर तू । वनमाळी ।।
कंजलोचन तू। कमलवदन।
मधुसूदन तू । जगदिशा ।।
रुक्मिणी वल्लभ । शामसुंदर तू ।
पुरुषोत्तम तू । नारायण।।
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अप्रतिम भक्तीमय अभंग रचना केली सरजी ✍️👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏🙏🙏
हटवासुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सचिनजी!🙏🙏🙏
हटवाखूप सुदंर
उत्तर द्याहटवा