शेतकरीराजा ... जगाच्या पोशिंदा ! पण.. त्याचा कष्टाला मोल नाही ; तो अख्ख्या जगाला पोसतो.पण...त्याला पोसण्याची ताकद कोणत्याही व्यवस्थेत नाही. हेच सर्वात मोठे दुःख होय. इतरांना सहज मिळते ; पण या ख-या राजाला मागुनही मिळत नाही. त्याची स्वप्न कधीच पूर्ण होतांना दिसत नाही.कधी अस्मानी तर कधी सुलतानी(सरकारी) संकटे त्याचा सतत पाठलाग करतात. त्यातच शेतकरी राजाचे आत्मबळ संपते. आणि तो हताश होऊन "आत्महत्येचा " मार्ग स्विकारतांना दिसतो. एका शेतक-याला त्याचा मुलगा सर्व संकटे झेलून जगण्याची विनंती करतो आहे.
बाबा... तुम्ही हरायचं नाय
आत्महत्येचा इच्चार
डोस्क्यात आणायचा नाय
तुमचं बोट धरुन मला
हे जग वाचायचं हाय...!
तुमच्या प्रामाणिकपणा अन् जिद्द
मला घ्यायची हाय!
हरामाने नव्हं ; घामातून पिकत्यात मोती
हे अख्ख्या जगताला दावायचं हाय!
बाबा तुम्ही तर माझ्या
जगण्याचा कणा हाय
आईच्या कुंकवाचे लेणं हाय
वादळ वारं येवोत कितीही
त्यांची दिशाच मी बदलणार हाय
तुम्ही फक्त माझ्यासवे पाय घट्ट रोवून
उभं राहायचं हाय
आमच्यासाठी तुम्हाला जगायचं हाय!
काळ्या आईशी ईमान जोडणार हाय
सेवा करुन हे जीवन बदलणार हाय
बाबा... तुम्ही फक्त माझं ऐंका..!
हे पाहण्यासाठी तुम्ही जगायचं हाय
आत्महत्येचा इच्चार...
डोस्क्यात आणायचा नाय!
©प्रा.पुरूषोत्तम पटेल
म्हसावद
अप्रतिम आणि हृदयस्पर्शी लेखन केले सरजी ✍️✍️🌟🌟🌟🌟
उत्तर द्याहटवासुंदर समिक्षा दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार मॅडमजी!🙏🙏🙏
हटवासुंदर कविता लिहिली.
उत्तर द्याहटवामनापासून आभार जी!🙏🙏🙏
हटवामनापासून आभार!🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा