प्रिय....
समस्ततिर्थदर्शिनी, प्रात:पूजनीय,आई...
तुला अनंत दंडवत प्रणाम !🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पत्र लिहिण्यास कारण की,
आज तुझा वाढदिवस ! 🎂
प्रथम तुला वाढदिवसाला माझ्याकडून आशुतोष भगवान शिवाला प्रार्थना ...!" माझ्या आईच्या समस्त इच्छा पुर्ण झाल्याचे समाधान तिला लाभावे. इच्छापूर्तीच्या आनंद अनुभवण्यासाठी तिचे शरीर निरोगी ठेव!ही विनम्र प्रार्थना! "
आई...केवळ दोनच अक्षरे ! पण त्या दोन अक्षरांचे सामर्थ्य कितीतरी मोठ्ठे आहे.त्या अक्षरात त्रिखंडाचे साम्राज्य पुर्णतः सामावले आहे.मी एका प्रवचनात संतांनी सांगितलेला महिमा ऐकल्याचे आठवते.ते म्हटले होते, " आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर.ईश्वरच आत्मा होऊन जिथे स्थिरावतो.ती आई ! " सर्व तिर्थात पवित्र आणि महान असं तिर्थ तुझ्या चरणसेवेत आहे.म्हणून तर आई-बाबांची चरणसेवा करणा-या पुंडलिकाच्या भेटीसाठी वैंकुठनाथ पृथ्वीतलावर आला.आणि इथंच २८ युगे उभे स्थिरावला. आई,तुझ्याच ठायी मला अखिल त्रिखडांची दैवते दिसतात. म्हणून तू माझी तिर्थरुप आई...तुला माझा त्रिवार प्रणाम !🙏🙏🙏
आई,मला खूप दिवसांपासून इच्छा होती, तुझ्याबद्दल काहीतरी बोलावं ! लिहावं ! पण...तुझ्यावर लिहिता-लिहिता कित्येक ओळी,कित्येक पानं, कित्येक रात्री संपल्या ग् ऽऽ पण,तुझ्यावर लिहण्यासाठी शब्द अपुरे पडू लागलेत !
आई तुझ्याबद्दलच्या भावनांना योग्य असे स्थान देऊ शकतील असे शब्दच मला अजूनतरी मिळालेच नाही ग् !
माधव ज्युलियन यांनी लिहलंय तेच खरंय , पटलंय मला !
" प्रेमस्वरुप आई, वात्सल्यसिंधू आई,"
माझी आई ...अगदी तशीच आहे तू ! समुद्र जसा कधीच आटत नाही.त्यांचे पाणी कमी झाले असे दिसत नाही.
समुद्राला तरी भरती येते,ओहोटी ही येते.तुझ्या प्रेमाला
ओहोटी ठाऊकच नाही तर ठाऊक आहे फक्त प्रेम, जिव्हाळा , माया-ममत्वाची भरती! तुझेही प्रेम कधीच कमी होत नाही. उत्तरोत्तर ते वाढतच जाते.🙏
आई, मग तूच सांग...तुला,तुझ्या कर्तृत्वाला,तुझ्या त्यागाला,
तुझ्या प्रेमाला मांडू तरी मी कुठल्या शब्दात ? हे शब्दात मांडणं म्हणजेच अशक्य !
आई,मला आठवतंय , मी एकदा आजारी पडले.तू माझ्या उशाशी रात्र रात्र जागत बसली होती म्हणे ! मला शांत झोप लागावी म्हणून आपल्या मांडीची झोळी करुन मला हळूवार
थोपटत,सलग तीन रात्रीचे दिवस करुन बसून राहिली होतीस ना तू ? तुझ्या ह्या वागण्याला मला " त्याग " म्हणता येईल का ग्ं आई ?
शाळेत दररोज मी जाते...पण वेळेची शिस्त तू पाळते...अगदी घड्याळाचे काटे होऊन राहतेस तू ! पहाटे दोन तास माझ्या आधी तू उठते.माझी सगळी तयारी तू करुन ठेवतेस.माझे दप्तर,माझा युनिफॉर्म,माझा खाऊचा डब्बा,सगळं काही काढून तय्यार ठेवतेस तू .
हे माझं काम, तू निरपेक्षपणे करते.तुझे हे वागणे " जिव्हाळा " ह्या भावनेत बांधता येईल का ग्ं आई ?
तूझी मला कळलेली अनेक रुपे...
तू माहेरची लेक, मामा-मावशीची ताई , सासरची सून , वहिणी , बाबाची बायको- अर्धांगिनी,आम्हा बहिणींची
" आई " आणि आजी-आजोबांची सुनबाई तूच आहेस...ही नाती निभवताना तू स्वतःचे अस्तित्वच विसरुन गेलीय.
अस्तित्व विसरण्याची तुझ्या ह्या वृत्तीला " कर्तव्य " म्हणता येईल का ग्ं ?
मी म्हणेन की,आई,राखतो तो राक्षस ! देतो तो देव !
तू तर काहीही न मागता तुझ्या इच्छा,मौजमजा,नटण-
सजणं,सगळं काही माझ्यासाठी सोडून दिलंय ! म्हणून भक्तांसाठी देव जसा हातातील काम व मुखातला घास सोडून धावत येतो.तशी तू वागते !
म्हणून मी तुला " ईश्वरी " असंच म्हणेन . कारण फ.मुं.नी म्हटल्याप्रमाणे -
आई खरंच काय असते?
लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
लंगड्याचा पाय असते
धरणीची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही उरतही नाही!
कवी प्रा.पुरुषोत्तम पटेल आईपणाची थोरवी सुंदर शब्दांत वर्णन करतात,
" आईपणाची देवालाही वाटे नवलाई ।
वैंकुठींचा राणा पंढरीत झाला विठाई । "
तुझी माझ्याबाबत असलेली प्रिती,लळा,जिव्हाळा,ह्यात वापरलेले रसायन बाजारात मिळणे अशक्यच ! कुठून झिरपते ग् आई हे रसायन ? आई,त्याची धनी फक्त आणि फक्त तूच !
आई...पुन्हा एकदा तुला माझे त्रिवार वंदन !
आणि वाढदिवसाचे अभिष्टचिंतन!!!🎂💐🙏
@ तुझीच प्रिय ,
स्विट
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अतिशय सुंदर लिखाण केले सर, आईही अशीच असते,निरपेक्ष प्रेम करणारी.आईविषयी जेवढे लिहू तेवढे कमीच आहे.खूप सुंदर .शब्दांत आईचे उद्दात रूप व्यक्त केले आहे.👌👌👌👌🙏
उत्तर द्याहटवातुमची सुंदर समिक्षा,लेखनाला देते दिशा! आभार मॅडमजी!🙏🙏🙏
हटवाखूप सुंदर आई ची महती....शब्द हि अपुरे पडतात तिच्या साठी...👌👍✍️🍫🌹🙏🙏❤️
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद मॅडम!🙏🙏🙏
हटवाअप्रतिम खूप छान👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद जी!🙏🙏🙏
हटवाआईची महती सुंदर शब्दांत वर्णन केली✍️👌👌👌
उत्तर द्याहटवामनापासून आभार मॅडम!🙏🙏🙏
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाआईची महती सुंदर कविता लिहुन व्यक्तकेली🙏🙏🙏🍵👍
उत्तर द्याहटवासरजी, मनापासून धन्यवाद!🙏🙏🙏
हटवासुंदर वणॅन केले,आईचे
उत्तर द्याहटवामनापासून आभार सरजी!🙏🙏🙏
हटवा