मित्रहो, आज राष्ट्रीय कन्यादिन... त्यानिमित्त माझ्या लेकीविषयीच्या मनभावना...
लेक माझी भाग्यश्री
गुणांची हो खाण
लेक जन्मा येता लाभला
आई बाबांचा मान ||१||
चाल तिची दुडूदुडू
मन करते प्रसन्न
बोल बोबडे बोबडे
कोकिळेचे मंजुळ गान ||२||
लेक माझी खेळे बागडे
घरी दारी अंगणात
सप्तसूर निनादती
तिच्या रुणुझुणू पैजणात ||३||
रुप लेकीचं गोजीरं
जणू बावनखणी सोनं
देवाजीनं दिलं आम्हा
सारे कुबेराचं धन ||४||
अहो.. लेक माझी भासे
जणू वडाचे झाड..
जन्म एक अन् फेडिते
दोन घरांचे पाड ||५||
© प्रा. पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अप्रतिमच ..सुंदर काव्य रचना ...सर..मस्तच खूप खूप छान लिहिलंय
उत्तर द्याहटवामनापासून आभार सचिनची!🙏🙏🙏
हटवाअतिशय सुंदर रचना केली सर👌👌👌👌कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
उत्तर द्याहटवामॅडम जी, खूप खूप आभार!🙏🙏🙏
हटवाफारच सुंदर रचनाविष्कार सरजी ✍️👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवामॅडम, आभारी!🙏🙏🙏
हटवाअप्रतिम शब्दरचना सर 😀
उत्तर द्याहटवामस्त प्रेमळ आणि सत्य भावना 🙏🤗
मनापासून आभार!🙏🙏🙏
हटवाखूप खूप धन्यवाद जी!🙏🙏🙏
हटवाफारच सुंदर लेकीबद्दल लिहले👌👌👌🙏
उत्तर द्याहटवामन:पूर्वक खूप आभारी सर!🙏🙏🙏
हटवाअप्रतिम 👌
उत्तर द्याहटवाखूपच छान भावना व्यक्त केल्या आहेत सर !
।।कंन्यारत्न ज्याचे घरी ।।
।। खरोखर लक्ष्मी नांदे सदोदित खरी ।।
कंन्यादिनीच्या खूप खूप शुभेच्छा 🌹
आबा 🙏
आबा, काव्यात्मक सुंदर टिप्पणी दिली.आपले मनापासून आभार!🙏🙏🙏
हटवाखूपच छान लिहिल आहे मुलीबद्दल 👌👌💐💐
उत्तर द्याहटवामॅडम जी, आपणांस मनापासून खूपच धन्यवाद! 🙏🙏🙏
हटवाअतिशय सुंदर...
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद देवेन्द्रजी!🙏🙏🙏
हटवाखूप छान भावस्पर्शी सर मला पण एक लेक आहे त्यामुळे मी समजू शकते तुपाच्या भावना माझी परी अजून लहान आहे 6 वर्षाची
उत्तर द्याहटवाखूप खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवा