Kaayguru.Marathi

बुधवार, सप्टेंबर २२, २०२१

पांडुरंग

गोड तुझे नाम   ।   गाईन मी देवा ।
अंतरीचा ठेवा।  ।  पांडुरंगा ।।१।।

भक्तांचा कैवारी ।  धावतो सत्वरी
नाथांचा श्रीहरी  ।  पांडुरंगा ।।२।।

केशवा माधवा   ।  तूच रे विठ्ठल ।
तू भक्तवत्सल    ।  पांडुरंगा ।।३।।

वैंकुंठीचा राणा   ।  तुकाचा कानुड्या
जनीचा श्रीखंड्या। पांडुरंगा ।।४।।

देवा  वनमाळी  । प्रेमाची सावली ।
भक्तांची माऊली ।  पांडुरंगा ।।५।।

© प्रा.पुरुषोत्तम पटेल
             " पुष्प "

८ टिप्पण्या:

  1. अप्रतिम भक्तीमय अभंग रचना सरजी ✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिमच भक्ती रचन सर सुंदर अभंग रचना

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...