कवितेची मैत्री
कविता असते
अज्ञाताच्या पलीकडची
चित्रकाराच्या कुंचल्यातली
हृदयात साठवायाची...
कवितेचा प्रत्येक टिंब
शब्दाचा प्रतिबिंब...
नकळत एकेक टिंबातून
द्रौपदीचे वस्त्र...
कितीतरी रेशमी
सहस्त्र अर्थ...!
अर्थाची सृष्टी.. आणि
जिव्हाळा भरायचा असतो
मनात काठोकाठ..!
कवितेच्या प्रवासाला असतो
युगायुगाचा पल्ला...
तो गाठतांना
अनुभवाच्या गाठी
घ्याव्या लागतात पाठी
पिढ्यांचा हे संचीत
म्हणूनच... ह्रदयापासून
जपायचे असते
नुसती ठेव म्हणून नव्हे ;
तर... वापरण्यासाठी!
जीवनाच्या समृद्धीला
घेऊन तिच्या आधार
कविता जगायची असते...
जगायची असते..!
©प्रा. पुरुषोत्तम पटेल
मु.पो.म्हसावद
अप्रतिम सुंदर सर
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर शब्द रचना आहे
उत्तर द्याहटवाअतिशय अप्रतिम रचना केली सरजी ✍️✍️🌟🌟🌟🌟🌟
उत्तर द्याहटवाधन्यवाद जी 🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद जी!🙏
उत्तर द्याहटवा