Kaayguru.Marathi

शुक्रवार, सप्टेंबर २४, २०२१

यशसिद्धी

यशसिद्धी

आले अपयश जरी
खचून नका जाऊ
करा प्रयत्न पुन्हा पुन्हा
नक्की यशस्वी होऊ
          अपयशातून यशाची
          घडते पहिली कृती
          म्हणती थोर विभूती
          हिच तर खरी उक्ती
अपयश आले म्हणूनी
संपवू नको जीवन
ठेवा जिंकायचा ध्यास
शिखर बघाया शिका
          अपयश पचवायला
          काळीज ठेवा वाघाचे
          दडले त्यात रहस्य
          यशाकडे जाणाऱ्या श्रेयाचे
अपयश तर शिकवी
नवे ज्ञान क्षणोक्षणी
अशाच अनंत वेड्यांची
इतिहास सांगतो कहाणी

 © प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्पम् "
     म्हसावद, जि.नंदुरबार

११ टिप्पण्या:

  1. सुंदर,आणि सकारात्मक विचार मांडला सरजी!✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. सुंदर,आणि सकारात्मक विचार मांडला सरजी!✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. सुंदर रचना आणि सुंदर सकारात्मक विचार मांडला सरजी!

    उत्तर द्याहटवा
  4. अतिशय सुंदर,सकारात्मक मनोबल वाढवणारी रचना 👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...