Kaayguru.Marathi

गुरुवार, सप्टेंबर ३०, २०२१

राग नको रे!(शिरोमणी काव्य)

" शिरोमणी काव्य रचना' ’ हा एक शब्दाधारीत काव्य प्रकार आहे. हा फारच सुंदर आणि मनाला भावणारा काव्यप्रकार आहे. काही जण याला " काव्य शिरोमणी " असेही म्हणतात.

१) या काव्यात प्रत्येक कडवे चार ओळींचे असते.

२) चार ओळीत दहा शब्दांची खालील प्रमाणे विभागणी असते.....

पहिल्या ओळीत एक शब्द,

दुसऱ्या ओळीत दोन शब्द

तिसऱ्या ओळीत तीन शब्द आणि

चवथ्या ओळीत चार शब्द

अशी एकूण दहा शब्दांची मांडणी असते.

३) एका विशिष्ट गोष्टीभोवती या काव्याची पूर्ण वीण गुंफलेली असते. हा शब्द प्रत्येक कडव्यात पहील्या ओळीत स्थायी असतो. म्हणूनच कदाचित या काव्यप्रकाराला शिरोमणी हे नाव पडले असावे. बाकीच्या तीन ओळीत त्याचे गुणवर्णन अथवा सकारात्मक किंवा नकारात्मक भाव दर्शविलेले असतात.

४) प्रत्येक कडव्यातील दुसऱ्या-चौथ्या किंवा तिसऱ्या-चौथ्या ओळीत यमक जुळलेले असावे.

५) कडवी किती असावी, याला मर्यादा नाही.

-: माझी स्वरचित शिरोमणी काव्य रचना :-

राग
असतो वाईट
लागू नये नादी
करतो तो जीवनाची बर्बादी

राग
नसे चांगला
करु नये जवळ
नष्ट करीतो जगण्याचे बळ

राग
ठेवा नियंत्रित
सोडू नये मुक्त
देहाचे प्रतिक्षण आटवी रक्त

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


२० टिप्पण्या:

  1. छान माहिती दिली सर 😊✌️
    सुंदर शब्दरचना । 😇

    उत्तर द्याहटवा
  2. छान माहितीपूर्ण संदेश, कविता शिरोमणी प्रकार छान

    उत्तर द्याहटवा
  3. अतिशय सुंदर माहिती दिली सर, आणि रचनाही खूप छान 👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  4. खुप सुंदर काव्यप्रकार..छान मार्गदर्शन... सुंदर रचना केली आपण सर, सुप्रभात...🌄👌👍💐

    उत्तर द्याहटवा
  5. अतिशय उपयुक्त माहिती आणि सुंदर रचना सर 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...