------------------------------------------------------
षढाक्षरी काव्यलेखन हा कविता लेखनातील एक सहज सुलभ काव्यनिर्मितीचा प्रकार होय.
षढाक्षर शब्दांची फोड अशी करता येईल.
षढ् म्हणजे सहा .याचाच अर्थ सहा अक्षरात लिहायचे ते षढाक्षरी काव्य.
काव्य लेखन नियम :-
१) हे काव्य लिहितांना सामान्यतः चार ओळींचे एक कडवे असे लिहावे.
२) चार ओळींची कडवी किती असावी ? याला बंधन नाही.
३) पण...शक्यतो षढाक्षरी काव्यलेखन करतांना चार चार ओळींचे सहा कडवे रचिले तर ते अधिक सुंदर वाटावे.
[ माझे मत.]
४) हे काव्य लिहितांना काव्यातील प्रत्येक ओळीत मोजून सहाच अक्षरे असावीत.
५) ओळीच्या प्रारंभीच्या शब्द एक दोन तीन चार अक्षरी असला तरी चालतो.
६) अष्टाक्षरी काव्यलेखनाप्रमाणे शब्दलेखनाचे बंधन नाही.
७) कडव्यातील प्रत्येक ओळ ही सहा-सहा अक्षरांचीच असावी.
८) चार ओळीपैंकी दुस-या आणि चौथ्या ओळीत " यमक " साधला जावा.हे लक्षात घ्यावे.
९) कडव्यातील प्रत्येक ओळ ही सहा-सहा अक्षरांचीच असावी.
उदा. १). २)
काय मागू देवा. * सखे तुझे रुप
तुजपाशी मी रे. * वेड लावी मला
न मागता दिले * काढू कसा ग मी
तू सर्वकाही रे. * जीव हा गुंतला
चला तर मग...लिहू आपण षढाक्षरी काव्य !👍
🙏🌹शुभस्य शिघ्रम !🌹🙏
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
खुप छान माहिती दिली आहे..... धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवानक्की प्रयत्न करणार ✍️✍️✍️
सुंदर माहिती दिली सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर माहिती दिली सर👌👌👌
उत्तर द्याहटवा