Kaayguru.Marathi

सोमवार, नोव्हेंबर २२, २०२१

विभूति [कविता]

जगात पूज्य विभूति एकदाच येते जन्माला
होऊ  शकत नाही तुलना तिच्या कर्तृत्वाला

मॉसाहेब जिजाऊ एकच शिवरायांची आई
त्यांच्या तोडीचे  कार्य  कुणा जमायचे नाही

शून्यातून मुहूर्तमेढ केली हिंदवी स्वराज्याची
शिवरायांनी वाहिली काळजी स्वतः रयतेची

पावन गंगा भूवरी आणितो तो एक भगिरथ
ज्योती सावित्रीने  ओढीला  ज्ञान सुवर्ण रथ

विज्ञान अंतराळ  क्षेत्री  चमकले रत्न कलाम
टाटा-बिर्ला अंबानी पतंजली उद्योगा सलाम

हास्यलेखन जगी जन्मले चिंवी पुल गडकरी
दमा,रमेशमंत्री,भेंडे,नगरकर लेखन मनोहारी

कविता नाट्य कथा विश्वी रमले शिरवाडकर
कथा कादंबरी  रमिले देसाई नेमाडे खांडेकर 

पुन्हा न  होणे फडके टिळक गांधी सावरकर
भगतसिंग राजगुरु  सुखदेव अन्  आंबेडकर

धन्य महान  विभूति  ज्यांनी रचिला इतिहास
गाईन मी  किर्ती त्यांची श्वासात असेतो श्वास

करितो मी  लेखन  त्याहून  मी कधी ना मोठा
वंद्य  ह्या  विभूति वंदितो चरण शब्द न खोटा

      © प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

१६ टिप्पण्या:

  1. अप्रतिम सुंदर रचना सर,जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🙏🙏🙏🌹🌼

    उत्तर द्याहटवा
  2. न भूतो न भविष्यती,
    युग पुरुष
    सुंदर लेखन सर👌👌👌
    विजय बोरदे

    उत्तर द्याहटवा
  3. वाहहह खुप सुंदर वर्णन केलं आहे सर्व विभुतींच...छान...👌👍💐🍫

    🚩जय शिवराय🚩

    उत्तर द्याहटवा
  4. वाह वाह सरजी अप्रतिम वर्णन केले आहे तुम्ही सर्व विभूतींचे 👌👌👌🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  5. खूप सुंदर या सर्व विभुते यांना मानवंदना दिली....खूप रचना सर..👌👍✍️🍫

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...