अहो दाजी ! जाऊ नका हो लांब,
कशाला चाचपडता शिळी ती भाजी
बघा या झाडाला
लगडले आंबे आले की पाडाला
रस चाखाया व्हा की तुम्ही राजी
अहो दाजी ! कशाला चाचपडता शिळी ती भाजी
आठवा भेट ती आपुली पहिली
रिमरिम सरी त्या ऋतू पावसाळी
नभी चमकली विज अवकाळी
कवेत येता तुमच्या झाले मी राजी
रस चाखाया या ना हो तुम्ही दाजी
अहो दाजी ! कशाला चाचपडता शिळी ती भाजी
मन झाले अधीर भेटाया हुरहूर
वाट पाहिन सायंकाळी नाक्यावर
घडता भेट तुमची आणि माझी
कशाला हवा दोघांत आपुल्या काझी
रस चाखाया या ना हो तुम्ही दाजी
अहो दाजी ! कशाला चाचपडता शिळी ती भाजी
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
...... Very Good....,,,,🙏🙏🙏🙏🙏,😀😀😀😀
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवावाहह.. खुप सुंदर रचनाविष्कार....👌👍💐🍫
उत्तर द्याहटवावा, सर सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिमच रचना.. व्वा!👌👌👌
उत्तर द्याहटवा