Kaayguru.Marathi

रविवार, नोव्हेंबर ०७, २०२१

विठ्ठल माझा

विठ्ठल माझा गाव विठ्ठल माझा भाव ।
हृदयी विराजे विठ्ठल माझा ।।

विठ्ठल माझा देव विठ्ठल माझी ठेव ।
अंतरीची तळमळ विठ्ठल माझा ।।

विठ्ठल माझी भक्ती विठ्ठल माझी शक्ती ।
चौ-याशीची मुक्ती विठ्ठल माझा ।।

विठ्ठल माझी नीति विठ्ठल माझी मती ।
जन्माची पुण्याई विठ्ठल माझा ।।

विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता ।
तारक गुरु अवघा  विठ्ठल माझा ।।

विठ्ठल माझा ठाव विठ्ठल माझा राव।
दिनदयाळू माऊली  विठ्ठल माझा ।‌।

विठ्ठल माझा राम विठ्ठल माझा शाम ।
जन्मभरीचा विश्राम विठ्ठल माझा ।।

विठ्ठल माझी इंद्रायणी विठ्ठल माझी चंद्रभागा।
पावन भिमाई विठ्ठल माझा ।।

पूजीन मी विठ्ठल गाईन मी विठ्ठल।
जपीन अखंडित विठ्ठल माझा।।

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
   म्हसावद
   भ्रमण-9421530412

१५ टिप्पण्या:

  1. विठ्ठल भक्तीत डुंबन्याची अनोखी संधी प्राप्त झाली.खूप सुंदर भक्तिमय रचना.

    उत्तर द्याहटवा
  2. विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल.आपल्या सुंदर काव्य गुंफणाने पंढरपुरची आठवण झाली सर, बा, पांडुरंगा तुझ्या दर्शनाचा परत योग येऊ दे
    👌👌👌🙏🙏🙏
    विजय बोरदे

    उत्तर द्याहटवा
  3. सुंदर भक्तीरचना केली सरजी ✍️✍️🌟🌟🌟🌟

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...