Kaayguru.Marathi

गुरुवार, ऑक्टोबर ०७, २०२१

शक्तीपीठ


" काव्य " सारस्वतांचे एक वाड्ःमयीन शक्तिपीठ आहे . 
दुर्गा , अंबा , चंडी , काली , भवानी ह्या आणि अशा देवता जशा एकाच शक्तीची अनेक रूपे आहेत ; त्याचप्रमाणे
 गीत , अभंग, ओवी , मुक्तछंद , लावणी , पोवाडा , दोहा , गझल , रुबाई इ. विविध स्वरूपांतून कविता प्रकट होत असते . . . . . . 
देवतांतील देवत्व आणि कवितांतील कवित्व ह्यांच्यात तत्त्वतः फरक नाही ; म्हणून भाविक आणि रसिक ह्यांच्यामधील आंतरिक नाते हे मुळात मनोगम्य असल्याने आध्यात्मिक नातेच आहे !
 - वा . न. सरदेसाई

संकलन- प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मधुचंद्र

लग्नाची पहिली रात्र…
मधुचंद्राची...
हुरहुर ती भेटीची
एकमेकांच्या मिठीत येण्याची
सरिता मिळे सागराला
तशी समर्पणाची…
होती अबोल शांत शांत
डोक्यावरती लफ्फेदार पदर…
अन् बावरलेली नजर
गुलाब फुलांच्या लडी
बसली होती कुरवाळत...
सप्तरंगी फुलांची रांगोळी
पलंगावरती विखुरलेली
कुंतलातील मोग-याचा गंध
दरवळ खोलीभर…
स्पर्श होताच ती
शहारली...अनाहूत लाटेसारखी
न कळे दोहोंना बेधुंद
बुडाले प्रेमसागरा आकंठ…
श्वासाश्वासाला भारुन गेला
रातराणीचा मधुगंध
शहारले रोमरोम अन्
उधानले तन-मन...
हरपले अवघे देहभान ...
अन् चंद्रही लाजला,रात्रीला
चोरुन...होता साक्षीला !
भूप राग पहाटगाणी !
वाराही आळवित आला


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


बुधवार, ऑक्टोबर ०६, २०२१

चुडीया

सजनीया क्या कहूं मैं
तुझ्या कांकणाची किणकिण
घायल कर जाती है मेरा जिया
दूर जाणे शक्य नाही सूर हे ऐकूण

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

हास्य (शेलकाव्य)

रे  मित्रा  राहू  नको  तू  उदास नेहमी
नेहमी   राहा   संसारी  तू  हसतमुख
मंत्र  घे तू ध्यानी वजा करावे रे दुःख
दुःख  ते  दे सोडून त्यातच आहे सुख

उक्ती झाले गेले अन्  गंगेला मिळाले
मिळाले  ते  आपुले  रे गेले ते दुजांचे
ओंजळीत  मावते ते हो आपुले सुख
सुख  करीता वजा शेष राही स्वतःचे

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


का? (द्रोण काव्य)

का
कसे
कुणाला
कशासाठी
का बरे रडावे
का अलीकडे मला
काही  वाटतंच  नाही
का कोण जाणे पण आता
का पहिल्यासारखे  डोळ्यात
काहीच   पाणी  दाटतच  नाही

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...