झाड देते सुख-सावली
स्वतः उन्ह पाऊस सोसून
हृदयी भरुन घ्यावा
सुसंस्कार त्याचापासून !
झाड दातृत्वाची शाळा
सर्वांनी नोंदवावे नाव
पान फूल खोड मूळ
शिकवीती त्याग भाव !
झाड क्षणाक्षणाला देते
सकल जीवांना श्वास
नि:स्वार्थ उभे वादळातही
नसे त्यास स्वार्थाची आस
झाडही जाणते प्रेम सौख्य
सुख दुःख महान भावना
सांगून गेले थोर ऋषीमुनी
वंदावे तयासी करु नका दैना
स्मरण असावा तुकाचा मंत्र
वृक्ष वल्ली आम्हा सोयरी...
आयुष्यभर करुया आपण
सुंदर मैत्री शत वृक्षांवरी !
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
खुप छान... !
उत्तर द्याहटवा🪴🌴🌳🌲🪴🌴🌳🌲🪴
सभी को यही बताना है,
सभी को पेड़ लगाना है।
🪴🌴🌳🌲🪴🌴🌳🌲🪴
धन्यवाद जी!🙏
हटवाChhan👌
उत्तर द्याहटवाउत्तम रचना
उत्तर द्याहटवाअप्रतिम शब्दगुंफन सरजी! ✍️🌟🌟🌟🌟
उत्तर द्याहटवासुंदर रचना 👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना सर....👍👌✍️🍫
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर संदेश मांडणी केलीत सर कवितेतून🌲🌲🌲👌👌👍👍👍
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवा