Kaayguru.Marathi

शनिवार, फेब्रुवारी १९, २०२२

शिवराजे ! जय हो ...

शिवराजे ! जय हो…
श्रीपती गडपती अश्वपती
माझे शिवराजे छत्रपती….
ठेवितो मस्तक आज मी
तुमच्या चरणावरती ।।१।।

भूपती श्रीमंतयोगी गजपती 
माझे शिवराजे छत्रपती…
ठेवितो मस्तक आज मी
तुमच्या चरणावरती ।।२।।

सुवर्णरत्नश्रीपती प्रजापती
माझे शिवराजे छत्रपती…
ठेवितो मस्तक आज मी
तुमच्या चरणावरती ।।३।।

अष्टप्रधानपती अष्टावधानपती
माझे शिवराजे छत्रपती…
ठेवितो मस्तक आज मी
तुमच्या चरणावरती ।।४।।

शस्रास्रपारंगती शूरविरराजनीति
माझे शिवराजे छत्रपती…
ठेवितो मस्तक आज मी
तुमच्या चरणावरती ।।५।।

सागराधिपती आरमाराधिपती
माझे शिवराजे छत्रपती…
ठेवितो मस्तक आज मी
तुमच्या चरणावरती ।।६।।

प्रौढप्रतापपुरंदर सिंहासनाधिपती
माझे शिवराजे छत्रपती…
ठेवितो मस्तक आज मी
तुमच्या चरणावरती ।।७।।

मनामनाधिपती न्यायाधिपती
माझे शिवराजे छत्रपती…
ठेवितो मस्तक आज मी
तुमच्या चरणावरती ।।८।।

स्वराज्याधिपती राजेशिवछत्रपती
माझे शिवराजे हृदयाधिपती…
ठेवितो मस्तक आज मी
तुमच्या चरणावरती ।।९।।

जय भवानी जय शिवाजी
गातो तेजाची आरती
ठेवितो मस्तक आज मी
शिवराजे तुमच्या चरणावरती ।।१०।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
          म्हसावद,जि.नंदुरबार






९ टिप्पण्या:

  1. अतिशय समर्पक लेखन सरजी 👌👍👏🙏
    जय भवानी! जय जिजाऊ!! जय शिवराय!!!

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम शब्दसुमनांजली ✍️👌👌👌जय शिवराय 🙏🙏🌹🌹

    उत्तर द्याहटवा
  3. जय शिवराय 🙏🏼🙏🏼
    खुपच सुंदर शब्दरचना 👌👌

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...