अमित... स्वत:ला खूप महान समजायचा.त्याला वाटे,मी एकटा फर्डा वक्ता आहे,मी सुरेल गायक आहे,मी अप्रतिम कुंचल्याचा धनी आहे;सप्तरंगाची जाण माझ्याशिवाय दुस-या कोणालाच नाही.मी सिद्धहस्त लेखक,कवी,गीतकारआहे,संगीतकार आहे. सर्वांनी आपलं
कौतुक करावं.असे त्याला मनातून वाटायचे.पण,दुस-यांचे कौतुक करणे त्याला आवडायचेच नाही.तरीही सुरुवातीच्या काही दिवसांत त्याचे कौतुक झालेही.इतरांनी कविता,गीतलेखन,गीतगायन,व्याख्यान असं काही केलं की, मनातल्या मनातच कुढत राही.त्यांचे सतत दोष काढत राही.तो हेवा करु लागे.दुर्मुखलेलाच होई.सुंदर,छान,असे शब्दहीत्याचा ओठांवर येत नसत. किंवा चांगले,ठिक, वाईट कोणतीही प्रतिक्रिया देणे त्याला मोठे संकटच वाटायला लागे.त्याला मनातून वाटे,'आपल्यावाटेवर कोणी चालूच नये! इतरांनी मोठे होऊच नये.'
म्हणतात ना ! ' समय बडा बलवान है। ' मन चिंती ते वैरी न चिंती या उक्तीप्रमाणे उत्तरोत्तर अमितची लोकप्रियता कमी होऊ लागली.त्याचाच काळात ,त्याचाच समोर अनेकांनी जनमानसात राहून सर्वांगीण क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठले.आणि आपल्या यशाचे खरे श्रेय आपल्या हितचिंतकांना, समिक्षकांना,वाचकांना दिलेही. त्यांच्याच ऋणात राहून वाटचाल करण्याचे संकल्पही केले.ते बहुसंख्य आज लोकप्रियतेच्या शिखरावर दैदिप्यमान होऊन विराजित झाले आहे.त्यांनी इतरांसाठी मनात असूया न जोपासता आपुलकी जोपासली.आपल्या पदपथावर ते इतरांसोबत चालत आहेत ते आजही समाजात कौतुकाचे धनी ठरत आहेत.त्यांच्या एका शब्दाला हजारोंची ' वाहवा ' मिळत आहे.
अमित मात्र आज ' व्वाव, बहोत खूब 'अशा शब्दांनाही पारखा झाला आहे.त्याची ' माणूसघाणा ' प्रवृत्तीच त्याचा लयाला कारणीभूत ठरली आहे.
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
सुंदर
उत्तर द्याहटवाNice 👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम संदेश ✍️👌👍👍👍
उत्तर द्याहटवा