जन्मभरी पाहीन तुला द्यावे ऐसे दान !
जाईन मी जेथे तेथे,तू सोबती असावा
माऊली होऊन माझी सावली तू व्हावा
स्मरीण मी नित्य देवा तुझे ऐसे ध्यान… ।।१।।
जन्मभरी पाहीन तुला द्यावे ऐसे दान !
श्वास असे तो देवा गाऊ दे तुझे नाम
देवा यावे भेटीलागी तू होऊन श्रीराम
जनीचा तू विठ्ठल तुकाच्या नारायण ।।२।।
जन्मभरी पाहीन तुला द्यावे ऐसे दान !
सहस्रकोटी सूर्य तेज तुझे जगन्नाथ
चक्रपाणि श्रीहरी तू लक्ष्मीचा नाथ
लक्ष्मी सवे दर्शन द्या हो मज जनार्दन ।।३।।
जन्मभरी पाहीन तुला द्यावे ऐसे दान
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
सुंदर प्रार्थना, भगवंताच्या नामस्मरणाशिवाय जिवन व्यर्थ 🕉️🕉️🛕🛕
उत्तर द्याहटवाविजय बोरदे
Sundar
उत्तर द्याहटवासुंदर 👌
उत्तर द्याहटवाAwesome, very nice 👌👌👏🙏🙏
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर
उत्तर द्याहटवासुंदर रचना👍👍👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय अप्रतिम अशी भक्तीमय प्रार्थना केली सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवा