Kaayguru.Marathi

गुरुवार, डिसेंबर ०२, २०२१

अवकाळी पाऊस

अरे पाऊसा तू असा रे कसा
जरा   ठेव  की दया - माया
वर्षभरी    येतो   अवकाळी
शेतकऱ्यांची  लुटतो  तू  रया

करीतो रे मी तुला विनवणी
येऊ  दे  ना  रे  तू   करुणा
हसू  दे  की   रे   शेतशिवार
थांबव   बळी  राजाची  दैना

तू आणितो संकट आस्मानी
मायबाप सरकार सुलतानी
कुणा रडावे कुणा आळवावे
कोरडे   डोळ्यातील   पाणी

चार  मास  तुला दिले देवाने
हसत  खेळत सृष्टीस भेटावे
नको  होऊ  रे  तू  वेडाखूळा
आठ   मास    शांत  झोपावे

ऐक अगदी साधी अन् सोपी 
सांगतो  गड्याऽऽ तुज  युक्ती
सुखी नांदू दे हिवाळा-उन्हाळा
थांबव तुझ्या नसत्या उचापती

तू लेकीच्या मायेने भेटी यावे
सृष्टी  मातेस   प्रेमभरे भेटावे
घडीभरी   करुन   गुजगोष्टी
हर्ष  आनंदें   निरोप  तू घ्यावे !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

१३ टिप्पण्या:

  1. खरंय अगदी अवकाळी पावसामुळे शेतकरी पार मोडला.वास्तव मांडले ✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. वाह.... खुपच सुंदर रचना अप्रतिम.... 👌👌✍️✍️
    खुपच छान आर्जव केली आहे पावसाकडे...

    उत्तर द्याहटवा
  3. वास्तवदर्शी व प्रासंगीक, खुप सुंदर , ह्रदयस्पर्शी ,अप्रतीम रचना...🥺👌👍

    उत्तर द्याहटवा
  4. कैफियत छान मांडली परंतु पर्यावरणाचा विचार केला तर ही अवकळा
    जागतिक तापमान वाढीमुळे आली
    विजय बोरदे

    उत्तर द्याहटवा
  5. अतिशय सुंदर वास्तविकता मांडली सर जी..👍👌👌👌💐

    उत्तर द्याहटवा
  6. अतिशय सुंदर वास्तविकता मांडली आहे सर..खूप छानच👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...