संकेत म्हणजे काय ?
आपले म्हणणे भाषेत कितीही शब्द घालून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी एखाद्या शब्दांचे पुष्कळ अर्थ धरण्याची आपल्याला सवय असते.तो गृहीत धरलेला विशेष अर्थ ठरलेला असला तरी सर्वांना सहज कळत नाही.अशा शब्दाने गृहीत धरला जाणारा विशेष अर्थ म्हणजे " संकेत " होय.
संकेत दोन प्रकारचे असतात.ते पुढीलप्रमाणे -
अ ) श्रद्धाप्रधान संकेत :- हे संकेत वेद,पुराणे, इतिहास वगैरे यावर आधारलेले असतात.
आ) कल्पनाप्रधान संकेत :- हे संकेत कविंनी निर्माण केलेले असतात.
असेच काही संकेत -
शून्य :-
शून्य हा आकाशवाचक शब्द.हे जगत् असत् आहे म्हणून ते शून्य आहे.सकल संसाराची उत्पत्ती शून्यापासूनच झाली आहे.हे सर्व चराचर विश्व शून्यातून निघाले आहे. ह्या विश्वाला " ब्रम्हांड " असेही म्हटले जाते.त्याच्याही आकार शून्याचाच ! ह्या शून्यातील सारे चराचर . हे शून्य
" अ-गणित " आणि " अ-क्षय्य " आहे.असे मानतात की, शून्याचा ' वृद्धी-क्षय ' होतच नाहीत, म्हणून ते अक्षय्य होय.
शून्यकान - कान नाही असा प्राणी म्हणजे - सर्प .
शून्यचरण - चरण म्हणजे पाय नाही असा प्राणी - सर्प.
शून्यशिर - शिर नाही असा प्राणी - खेकडा.
---------------------------------------------------------
एक - एकोऽहम् .एकच ब्रम्ह . ब्रम्ह हे एकच आहे.
एक आत्मा - जगदात्मा.
एकदंत - गणपती.
एक मूळप्रकृती - आदिमाया
एकाक्षरी मंत्र - ॐ हे ईश्वराचे उत्तमोत्तम प्रतीक होय.
प्रजापतीने अनुक्रमे देव, मनुष्य व असूर या आपल्या तिन्ही अपत्यांना हा एकाक्षरी मंत्र दिला.
[संदर्भ- बृहदारण्यक अध्याय ५-२]
एक देव - एको देव: सर्वभूतेषु गूढ: । सर्व व्यापी सर्वभूतान्तरात्मा ।देव हा एकच आहे.[ श्वेताश्वेतार - ६-११]
एक शत्रू - अज्ञान .हा मानव जातीच्या सर्वात मोठा शत्रू होय.[ महाभारत शांतिपर्व-२९७-२८]
एकाच्याच आश्रयाने असणारे एकवीस गुण-
रुप,रस,गंध,स्पर्श,एकत्वम्,पृथक्वतम्,परिमाण,परत्वे,अपरत्व,बुद्धी,सुख, दुःख इच्छा,द्वेष,यत्न,
गुरुत्व,द्रवत्व,स्नेह,
संस्कार,अदृष्ट आणि शब्द.[ शब्द कल्पद्रुम ]
(पुढील भागात अंक २ वर आधारीत संकेत वाचा.)
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अतिशय सुंदर माहिती दिलीत सर
उत्तर द्याहटवाअभ्यासपुर्ण विश्लेषण..मस्त..!
उत्तर द्याहटवाछान माहिती दिलीत ✍️✍️🙏🏼
उत्तर द्याहटवाSo nice..Waiting for next next part
उत्तर द्याहटवासुंदर संकेत 👌👌👍
उत्तर द्याहटवाखूपच छान
उत्तर द्याहटवाखुप सुंदर माहीतीपूर्ण लेख..आतुरता पुढील भागाची...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👌
उत्तर द्याहटवाउपयुक्त माहितीपूर्ण लेख लिहिला सरजी अप्रतिम लेखन ✍️👌👌👌 पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे 👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर माहिती आहे सर👌👍
उत्तर द्याहटवाखुप छान
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर लेख सरजी
उत्तर द्याहटवा