कोण कसा बोलतो ते आता समजत आहे
सलगी कुणाशी करावी कळू लागले आहे
अंधारात चालून उजेडाची वाट गवसत आहे
आपला परका ओळख आता पटू लागलीय
जीव लावावा कुणाला तेही कळू लागलंय
कोण कसं स्वार्थी ते आता समजू लागलंय
अंधार गुरु उजेडाची दिशा सांगू लागलाय !
दुनिया मतलबाला लाडाने जवळ करतेय
गरज पूर्ण होताच अंग चाबकाने फोडतेय
भावना ठेवून सुडाची तर लचकेही तोडतेय
खाच खळग्यातील वाट ध्येयाकडे नेतेय!
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अप्रतिम रचना 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाNice Sirji 👌👌
उत्तर द्याहटवाहूबेहूब समाजातील वास्तव मांडले सरजी ✍️👌👌👍👍
उत्तर द्याहटवावास्तविक
उत्तर द्याहटवा