Kaayguru.Marathi

शुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१

चिऊताई , कविता

चिऊताई

चिऊताई,चिऊताई

कुठे गेली ग् बाई ?

तुला टाकून घास मला

गोड लागतच नाही

सोड रुसवा ऐक विनवणी परत ये ग् बाई


प्रेमळ माझी आई 

घास भरवते मला

राखून ठेवते रोज

एक घास तुझाच

जेवायला माझ्याशी तू परत ये ग् बाई


सिमेंटच्या गावात

घरटी मोडून गेली 

म्हणून रागावून तू

उडून का दूर झाली

देईन तुला सुंदर घरटे परत ये ग् बाई


पिल्लांना तुझ्या मी

खूप लळा लावीन

तांदळाची कणी 

खायला गे घालीन

अंगणात बागडाया तू परत ये ग् बाई


तुझा चिवचिवाट

मला हवासा वाटे

काऊच्या कावकाव

भयकारीच वाटे

आनंदें नाचू आपण तू परत ये ग् बाई


तुझे आणि माझे

जन्मजन्माचे सख्य

जीवापाड जपेन मी

पुरविन सारे लक्ष

गप्पा करु एकमेकी तू परत ये ग् बाई


नको धरु चिऊताई

माणसांची ग् भिती

प्रेमाने जोपासू दोघी

घट्ट मैत्रीची नाती

माणसाला साद द्याया तू परत ये ग् बाई

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "



५ टिप्पण्या:

  1. अप्रतिम चिऊताई साकारली सरजी ✍️✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुंदर रचना केली सर,खरेच आजकाल
    चिमण्या लुप्त होत चालल्या आहेत या सिमेंटच्या जंगलात.
    पुढील पिढीला तर बहुतेक पुस्तकातूनच चिमणी
    पाहायला मिळेल की काय असे वाटते!👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...