Kaayguru.Marathi

गुरुवार, सप्टेंबर ०९, २०२१

भूलोळी : लेखन विषयक नियम


मित्र मैत्रिणींनो... नमस्कार !🙏
भूलोळी , मनाला भूरळ पाडणारी शब्दरचना ! केवळ चार ओळीत सुंदर काव्यलेखनाचा हा नवीन प्रकार मला  देवी शारदा कृपेने सहज स्फुरला.हा एक नवीन काव्यरचना प्रकार.हा लेखन प्रकार जन्मा घालावा असा देवी शारदेने जणू मजला आदेश दिला.तीजला वंदन करुन मी
 " भूलोळी " या लेखन प्रकारात लेखन करीत आहे !
[माझे प्रथम भूलोळी लेखन pratilipi वर दि.१७ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसिद्ध झाले आहे.आजपावेतो ६५ भूलोळी लिहून पूर्ण केल्या असून pratilipi वर प्रकाशित झाल्या आहेत.व यापुढेही लेखन सुरुच आहे.]

✒️ देवी शारदे !🌹🙏( भूलोळी क्र १  )
मॉ तुझे मेरा प्रणाम🙏
आज दे तू मजला आशिष
करता रहूं मैं तेरा गुणगान
लिहितो आद्य भूलोळी झुकवून शीश

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

" भूलोळी " ही फक्त चार ओळीत लेखन करावयाची असून तिला शब्दांची नव्हे; तर, ४२ अक्षरांची मर्यादा आहे.पहिली आणि तिसरी ओळ हिंदी भाषेत ,तर दुसरी आणि चौथी ओळ मराठी भाषेत अशी ही मनमोहक नुतन काव्यरचना आहे.माझ्या स्वतःच्या प्रतिभेने स्फुरले भूलोळी लेखन प्रकाराविषयी अधिकची माहिती - 
पहिली ओळ (हिंदी) अक्षरसंख्या  -०८
दुसरी ओळ (मराठी)अक्षरसंख्या - १०
तिसरी ओळ (हिंदी)अक्षरसंख्या -  १२
चौथी ओळ (मराठी)अक्षरसंख्या - १४
दुसरी व चौथी ओळ यात यमक साधला आहे.
आपणही माझ्या या नवीन भूलोळी रचना प्रकारात मी केलेले लेखन वाचन करावे. समिक्षा द्यावी.
ही आनंददायी भूलोळी आपणास भूरळ घालेलच! आपणही लेखन करुन चालना द्यावी .🙏
✒️ भूलोळी- रचना क्रं.२

२) ए शोना
शोना तेरे बिन मेरा
एक क्षण ही जात नाही ग्
कैसे कहूं जानू मैं तुम्हारे सिवा
आयुष्यात सुखी होऊ शकत नाही ग्

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
   म्हसावद,(नंदुरबार )

१९ टिप्पण्या:

  1. प्रत्युत्तरे
  2. अतिशय सुंदर रचना आणि माहिती दिली नविन काव्य प्रकाराविषयी👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. वाह
    काहीतरी नवीन वाचायला मिळाले
    मस्तच 😇✌️

    उत्तर द्याहटवा
  4. अतिशय अप्रतिम अशी भूलोळी रचना केली सरजी ✍️✍️🌟🌟🌟🌟🌟🌟

    उत्तर द्याहटवा
  5. अतिशय सुंदर भूलोळीची माहिती दिलीत व नवीन
    काव्यरचना शिकवलीत सर...✍️🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  6. हायकू हा जपानी काव्य प्रकार माहिती होता. हा मराठीतील नविन काव्यरचना प्रकार माहिती झाला सर . खूपच सुंदर रचना .

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...