Kaayguru.Marathi

बुधवार, सप्टेंबर २९, २०२१

अहो बाबा..!


" ये घे ना, त्याला काय होतंय पासून ते कॅन्सर पर्यंतचा प्रवास तंबाखू करत असते.एका सर्व्हे मध्ये असे दिसून आले की जेवढे सैनिक बॉर्डर वर शहिद होत नाहीत त्यापेक्षा कितीतरी जास्त लोक कॅन्सर ने जगभरात मरत आहेत.,तेव्हा मित्रांनो , कुठंतरी थांबलं पाहिजे आणि थांबण्यासाठी आपणही प्रयत्नशील होऊ या.तंबाखूमुक्मत समाज, तंबाखूूमुक्त  महाराष्ट्र चळवळीत आपणही योगदान देऊ चला !🙏 "  
(तंबाखुमूक्त अभियान अंतर्गत कविता) 
अहो बाबा करितो विनवणी 
तुम्ही नका हो तंबाखू खाऊ 
तंबाखूविना आपण सारे 
नक्की आरोग्यसंपन्न होऊ 
         शाळेत गुरुजींनी सांगितले
         आज तंबाखूचे दुष्परिणाम 
         ते तुम्हा सर्व मी सांगतो
         बसा शांतपणे ऐका पाहू 
बाबा,तंबाखू विडी कॅन्सरची 
आहे की खूप दाट दोस्ती 
त्यांच्या जाळ्यात नका जाऊ 
हे भयानक चित्र बघा पाहू. 
         बाबा, तुम्ही आमचे आधारवड 
         संकट येता शितलछाया 
         नवा संकल्प हृदयी धरु 
         तंबाखुमूक्त मंत्र जगी देऊ 
                                   ©प्रा.पुरूषोत्तम पटेल, 
                                             मुं.पो.म्हसावद 

२१ टिप्पण्या:

  1. हळवी , सुंदर , प्रामाणिक शब्दरचना
    सद्याच्या काळाची गरज आहे ही। 👍💐

    उत्तर द्याहटवा
  2. तंबाखू मुक्त जीवन काळाची गरज आहे आजची अतिशय सुंदर पद्धतीने नात्यातील वीण ओवली सरजी ✍️����

    उत्तर द्याहटवा
  3. खुप सुंदर सामाजिक संदेश देणारी, प्रेरणादायक , अप्रतीम रचना सर...👌👍💐🍫

    जागतिक ह्रदयदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...💛💛💛💐💐💐💛💛💛

    उत्तर द्याहटवा
  4. सुंदर लेखन सर , संदेश तर ह्रदयस्पर्शी 💯👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  5. सुंदर लेखन सर, संदेश तर ह्रदयस्पर्शी 💯👌👌

    उत्तर द्याहटवा
  6. संदेश हदयस्पर्शी आहे. अप्रतिम कविता

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...