Kaayguru.Marathi

बुधवार, मे २०, २०२६

निळी डायरी


मी लिहायचो तुझ्या माझ्या गप्पा
ती होती एक सुंदर निळी डायरी !
त्यात लाल अक्षरात लिहिली होती
मी पहिल्या प्रेम पत्राची गोष्ट भारी

तुला भेटायला गुलाबपुष्प घेऊन
आलो होतो मी हिमतीने तुझ्या घरी
पण तू मला मी तुला भेटलेच नाही !
कारण दोन कुत्रे होते गेटवर भारी

डोळ्यात तेल घालून बसलो मी
तू येण्याची वाट पाहत तुझ्या दारी
अखेर सूर्य मावळून आली सांजवेळ
दिवे लागणीला झाली भेट आपुली खरी!

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"

७ टिप्पण्या:

  1. अरे बापरे लयच भारी लिहलं...कोण होती ती ललना..एकदम डायरीच्या पानावर उतरली...मस्त मस्त कविता मजा आली...🤣🤣 पुष्पा भोसले

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान भेट.....👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम रचनाविष्कार सरजी ✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  4. श्री. किशोर एफ. चव्हाण२१ मे, २०२६ रोजी ७:४१ AM वाजता

    सुंदर 👌🏻👌🏻👌🏻

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

आईच्या हातचा गाजर हलवा!

आईने  गाजरं  किसली अन् प्रेमाने भिजली आज थंडीच्या पहाटे चुलीवर कढई सजली! साजूक तुपाचा सुगंध जणू घरभर दरवळला किसलेल्या  गाजराचा  ...