Kaayguru.Marathi

सोमवार, मे २५, २०२६

विचित्र फोन

विचित्र  फोन  ती एकटीच  वापरायची
दुज्यानी  हात लावणे तर होते  कठीण
तो फोन ओळखायचा फक्त तिच्या हात
रिसिव्ह  करणारा क्षणोक्षणी होई क्षीण

विचित्र फोनमध्ये होते दहा विचित्र शून्य
त्यांचे  रहस्य होते केवळ तिला ठाऊक 
रिसिव्ह  करताच  हॅल्लोऽऽ म्हणताच ...
आवाजाच्या मायाजालात तो होई भावुक 

विचित्र  फोनच्या  मदतीने तीने केलेय 
आयुष्यभरात  न  मोजता  येणारे  धंदे
आज मात्र मिळाला एक शेरास सव्वाशेर
टाकली  तुरुंगात  पळून गेले सगळे बंदे 

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Mhasawad.blogspot.com

आईच्या हातचा गाजर हलवा!

आईने  गाजरं  किसली अन् प्रेमाने भिजली आज थंडीच्या पहाटे चुलीवर कढई सजली! साजूक तुपाचा सुगंध जणू घरभर दरवळला किसलेल्या  गाजराचा  ...