सखे...ओळखायला शिक तू
जनमाणसांचे उधळलेले रंग
संशयाचे काढून फेक पोपडे
हर्ष येईल दारी टळेल प्रीतभंग
सखे...ओळखायला शिक तू
तानापिहिनीपांजा रंगाचे धर्म
कोणीही चोरी करु शकत नाही
तुझे माझे गोड प्रेमळ वर्म !
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
सखे...ओळखायला शिक तू
सखे...ओळखायला शिक तू
तानापिहिनीपांजा रंगाचे धर्म
कोणीही चोरी करु शकत नाही
तुझे माझे गोड प्रेमळ वर्म !
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
झाड देते सुख-सावली
झाड दातृत्वाची शाळा
सर्वांनी नोंदवावे नाव
पान फूल खोड मूळ
शिकवीती त्याग भाव !
झाड क्षणाक्षणाला देते
सकल जीवांना श्वास
नि:स्वार्थ उभे वादळातही
नसे त्यास स्वार्थाची आस
झाडही जाणते प्रेम सौख्य
सुख दुःख महान भावना
सांगून गेले थोर ऋषीमुनी
वंदावे तयासी करु नका दैना
स्मरण असावा तुकाचा मंत्र
वृक्ष वल्ली आम्हा सोयरी...
आयुष्यभर करुया आपण
सुंदर मैत्री शत वृक्षांवरी !
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
रंगोत्सवावाच्या गर्दित सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...