मुळी माझे म्हणणे सांगतो सुलभ भाषेत
कठिण असे सांगणे आवडत नाही काही
काही ऐकावे ते टाळून वाहते तू लाटेत
राणी तूझ्या भल्यासाठी माझा एक एक शब्द
शब्द नव्हे ते असतात जीवन संजीवक !
तू समजून घ्यावे शब्द आणि वाक्याचे अर्थ
अर्थ करि विचार समृद्ध आयुष्य तारक
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "