मेघांचा होऊन दूत
सुसाट आला वारा
लोकहो,सावधान!
कोसळतील धारा
उंच नभी दिसे मग
जलद श्वेत - काळे
धोऽधोऽ बरसून ते
भरून देती तळे !
क्षणात भासे सृष्टी
जणू षोडश नवरी
हर्षभराने नाचती
जीवसृष्टी भूवरी !
मुक्त वाहू लागले
नदी ओहोळ झरे
भिजल्या रानात
आनंदें गाती पाखरे
सर्जा राजा संगती
बळीराजा मुठ धरी
एक दाण्याचे होऊ दे
हजार दाणे श्रीहरी!
©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"
खूप सुंदर....मेघदूत अणि पावसाचे सुंदर स्तुती रचना , आशीर्वाद आणि धन्यवाद सर्व सुंदर शब्दांत व्यक्त केले आहे. 👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाखुप सुंदर काव्य रचना 👌
उत्तर द्याहटवाआबा 🙏
कवितेचा शेवट खूप मस्त आहे
उत्तर द्याहटवाव्वाव अप्रतिम रचनाविष्कार सरजी ✍️👌👌👌🩷🩷🩷
उत्तर द्याहटवा