Kaayguru.Marathi

बुधवार, जून ०३, २०२६

जुनी सायकल

जागतिक सायकल दिनानिमित्त काव्यरचना !
आज अडगळ साफ करतांना
दिसली मला जुनी सायकल 
म्हणाली,आठवले का ते दिवस?
अरे,बघतोस काय? फिरायला चल!

अरे...पंचवीशीत तर तू दिसायचा
सडपातळ राजबिंडा अन् सुडौल
आता माझ्यापासून दूर गेल्यावर 
बघ,दिसतोय जाडजूड रोलम् गोल! 

तू दोन पायांचा मला दोन चाकं
माझ्या सीटवर मार तू फतकल 
जाऊ रेऽऽ दोघे मस्त फिरायला
तू मार ना गड्या माझे पायडल!

सहा महिने कर तू माझ्याशी
पुन्हा लई भारी दोस्ती मस्तवाल
उतरवून देईन मी शरीर तुझे
नक्की देईन तुला हरीणाची चाल!

सकाळ सायंकाळच्या सफरसाठी
दररोज दोन किमीने वाढव चाल
अरे,जरा व्याधी धुमऽऽ पळेल 
तुझे तन-मन होईल मालामाल!

कान देऊन ऐकत होतो मी
जे शब्द बोलत होती सायकल
पटलंय ग् बाई,आरोग्यम् धनसंपदा!
करतोय मी गट्टी...फिरायला चल!

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म्.पटेल " पुष्प"


३ टिप्पण्या:

  1. खरच सायकल सारखा उत्तम व्यायाम दुसरी कडे कुठे मिळणार काय..अगदी लहानपणी सायकल शिकायला भारी वाटायच..ज्याच्या कडे सायकल तो श्रीमंत समजल्या जायच.. मित्रां मधे त्याचा रूबाब असायचा....जुन ते सोन होत..आता मुल जिम मधे जावून सायकल चालवतात..अन जुने लोक अजूनही सायकल चालवतात..खूप छान लिहलस

    उत्तर द्याहटवा
  2. खुप छान!
    आता जसा सगळीकडे गुळाचा चहा सुरू आहे तसेच काही दिवसांनी सर्वांना आरोग्यासाठी सायकलवर स्वार व्हावे लागेल.

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

आईच्या हातचा गाजर हलवा!

आईने  गाजरं  किसली अन् प्रेमाने भिजली आज थंडीच्या पहाटे चुलीवर कढई सजली! साजूक तुपाचा सुगंध जणू घरभर दरवळला किसलेल्या  गाजराचा  ...