Kaayguru.Marathi

बुधवार, जुलै १५, २०२६

मेघांचा दूत


मेघांचा होऊन दूत
सुसाट आला वारा
लोकहो,सावधान!
कोसळतील  धारा

उंच नभी दिसे मग
जलद श्वेत - काळे
धोऽधोऽ बरसून ते
भरून  देती तळे !

क्षणात भासे सृष्टी
जणू षोडश नवरी
हर्षभराने   नाचती
जीवसृष्टी  भूवरी !

मुक्त  वाहू  लागले
नदी  ओहोळ  झरे
भिजल्या    रानात
आनंदें गाती पाखरे

सर्जा  राजा संगती
बळीराजा मुठ धरी
एक दाण्याचे होऊ दे
हजार दाणे श्रीहरी!

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"

४ टिप्पण्या:

  1. खूप सुंदर....मेघदूत अणि पावसाचे सुंदर स्तुती रचना , आशीर्वाद आणि धन्यवाद सर्व सुंदर शब्दांत व्यक्त केले आहे. 👌👌👌🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. कवितेचा शेवट खूप मस्त आहे

    उत्तर द्याहटवा
  3. व्वाव अप्रतिम रचनाविष्कार सरजी ✍️👌👌👌🩷🩷🩷

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

आईच्या हातचा गाजर हलवा!

आईने  गाजरं  किसली अन् प्रेमाने भिजली आज थंडीच्या पहाटे चुलीवर कढई सजली! साजूक तुपाचा सुगंध जणू घरभर दरवळला किसलेल्या  गाजराचा  ...