Kaayguru.Marathi

शनिवार, डिसेंबर ०६, २०२५

कुणाच्या प्रेमात?


कुणाच्या  प्रेमात कोण?
आपण  विचारावे  कसे
सवाल ऐकताच  येते हो
दुसऱ्याला आपल्यावर हसे !

पुत्र म्हणून...मी आहे हो
आईच्या वात्सल्य प्रेमात
अन् आकंठ बुडालोय मी
प्रिय बाबाचा विश्वासात!

पती   म्हणून... पत्नीवर
करतो मी जिवापाड प्रेम
मला वाटते  तुमचे माझे
अन् जगभर असेल सेम!

कुटुंब  प्रमुख म्हणून तर
सगळ्यांचा  मला  लळा
चंदनाची शितलता जपून
फुलवितो प्रेमाचा  मळा !

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"


१४ टिप्पण्या:

  1. अप्रतिम लेखनशैली सरजी ✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम लेखनशैली सरजी ✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. श्री. किशोर एफ. चव्हाण६ डिसेंबर, २०२५ रोजी १:३५ PM वाजता

    अप्रतिम! खूपच सुरेख रचना!

    उत्तर द्याहटवा
  4. खूपच अर्थपूर्ण लिहल आहे..सुंदर रचना केली..एक घरातली व्यक्ती प्रत्येकावर विविध रूपात प्रेम करत असते..प्रेमाची व्याख्या ,प्रेमाच रूप प्रत्येक घटकांसाठी वेगळ असतं..त्याच प्रेमाने नाते फुलतात अधिक दृढ होतात.....पुष्पा भोसले

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मॅडम,प्रेरक समिक्षा नोंदविल्याबद्दल मनापासून आभार 🙏

      हटवा
  5. खुपच सुंदर रचना.....👌👌🙏🙏💐💐

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...