शेतकरी आणि त्याचा सर्जा-राजा यांचं नातं अतूट असतं!आपल्या धन्याशी इमान राखण्याचे वचन देऊन त्यास धिरोदात्तपणे जगण्याचे बळ देणारी ही भावस्पर्शी रचना !
मालक, कितीही येवू द्या...
पाऊस वादळ अन् वारा
आम्ही सर्जा राजा सदा सोबत
येऊ देऊ नका अश्रुधारा
श्वास असेतो तुमच्यासाठी
चिखलात चालू आम्ही वाट
तुमच्यासवे दिवसरात्र राबू
पाहू आपण समृद्धीचा घाट
उन्ह असो वा कडक थंडी
तमा आम्ही बाळगणार नाही
स्वेदगंगेत न्हाऊ दोघे सदैव
शेत फुलवायला बारमाही
जगाचा पोशिंदा म्हणून ...
मालक, जपून ठेवा सत्व
विनंती आहे माझी तुम्हाला
राखा बळीराजा म्हणून अस्तित्व!
©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा