अक्षरवेड्या साहित्यिकांची
नाशिक नगरी मांदियाळी
स्नेह सौख्य आनंदाचा
चला लावूया टिळा भाळी. ।।१।।
पंचवटीच्या पाच वटांचे
निर्मळ भावे दर्शन घेऊ
दशरथनंदन प्रभू रामाचे
एकनिष्ठेचे गुणगान गाऊ ।।२।।
सरस्वतीचे पूजक आम्ही
उचलू हो गुरुजींच्या वसा
भिमरायाच्या समतेचा
शब्दाशब्दांत उमटवू ठसा ।।३।।
विनायकाची अक्षरलेखणी
पोहचवू साता समुद्रापार
उभवू माय मराठीचा झेंडा
प्रसंगी झेलू उरावरी वार ।।४।।
घेतले व्रत अक्षर गुंफण्याचे
तात्यांचा तेजस्वी लेखणीचे
गणबोलीचे वैभव लेवून
विश्व जागवू खान्देशकन्येचे ।।५।।
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
छान! 👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी 🙏
हटवाअप्रतिम लेखन ✍️👌👌
उत्तर द्याहटवाआभार!🙏
हटवाखूप छान अप्रतिम सोहळा पार पडला त्याबद्दल खूप छान काव्य केलेत sir
उत्तर द्याहटवामन:पूर्वक धन्यवाद मॅडम!🙏
हटवाअप्रतिम 👌👌👌👍👍
उत्तर द्याहटवास्नेह संमेलनात भेटलो जास्त वेळ गप्पांसाठी देता आला नाही त्यामुळे मनांत खंत होती असो आपण असेच भेटत राहू या लवकर मग वैचारिक गप्पांचा फड बसवतां येईल आपल्या ब्लॅागचे डिझाईन आवडले अप्रतिम संकल्पंना 🙏🌹🌹🙏😊😊 नितिन शिंपी नाशिक
उत्तर द्याहटवा