माझी माय
चालत होतो एकटा
होती ती एक भयाण रात्र
घेऊन अनवाणी दोन पाय
तुडवित होतो रस्ता…
खाचखळगे, दगडधोंड्यांनी भरलेला
कधी पडलो,कधी ठेचाळून पडलो
खाल्ल्या अनंत खस्ता
पायात घुसला काटा
पोहचलो कसाबसा घरी
माझ्या येण्याची वाट पाहत…
चिंतेत बसली होती दारी
दोन्ही पाय रक्तबंबाळ पाहून
मोकले धायऽऽधाय
जिव्हाळा हृदयीचा
शांत राहिना…
कोण हो ती?
ती तर माझी माय !
ती तर माझी माय!
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अतिशय सुंदर रचना आई साठी
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना 👌👌✍️✍️💐💐
उत्तर द्याहटवासुंदर लेखन
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचनाविष्कार सरजी! ❤️स्पर्शी कवि ता🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाखूप मस्त
उत्तर द्याहटवाExcellent sirji
उत्तर द्याहटवाअप्रतिम सरजी
उत्तर द्याहटवाFabulous khup chhan kavita
उत्तर द्याहटवा