पंख पसरुन घ्यावी उंच आभाळी झेप तू ।।१।।
असतील जरी दाणे सोने रुपे नी मोत्यांचे
टाकूनिया दे तू सारे पाश मोह मायेचे तू ।।२।।
दिले देवाने पंखात बळ हे विहरण्याचे
ओलांडून जा सागर नदी डोंगर दूर तू ।।३।।
तोड गड्या पायाची रे बेडी सोन्याची दास्याची
सामर्थ्याचा गर्व नये हो दिनांचा कैवारी तू ।।४।।
जग एक बंदिशाळा कोणी न येथे कुणाचा
कारा तोडुनिया व्हावे जगन्नाथ सृष्टीचा तू ।।५।।
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
खूप सुंदर रचना
उत्तर द्याहटवातेजसभाई,मनापासून आभार!🙏
हटवाप्रेरणादायी रचना... 🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर.... 👌👌👌
मॅडम, मनापासून आभार!🙏
हटवाअप्रतिम सर
उत्तर द्याहटवासरजी, मनापासून आभार!🙏
हटवासुंदर रचना 👌
उत्तर द्याहटवाझेप घ्यावी तू उंच नभी... दिगंतराळी!
हटवाखूपच छान सर👍👌
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद!🙏🙏🙏
हटवा