Kaayguru.Marathi

शनिवार, ऑक्टोबर ०९, २०२१

गौरीपती [ प्रज्ञा भावकाव्य ]

कैलाशपती 
शंभो गौरीपती
नमितो दे सन्मती

हे काशीपती
वेदवाचस्पती
नमितो विश्वपती

हे जटाधारी
मदन संहारी
नमितो त्रिपुरारी

© प्रा.पुरुषोत्तम पटेल
          " पुष्प "

शारदीय नवरात्रोत्सव: तिसरी माळ- देवी चंद्रघंटा

शारदीय नवरात्रोत्सव: तिसरी माळ - चंद्रघंटा
     
     नवरात्री मग ती वासंतिक नवरात्र असो वा शारदिय नवरात्र. दुर्गा मातेच्या प्रत्येक रुपाचे, प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्व आहे. दुर्गा मातेची प्रत्येक रुपं तिच्या वेगवेगळ्या शक्तींसाठी ओळखली जातात.

आईला कमल आणि शंखपुष्पीची फूल अर्पण करावे. ❤️आज चैत्र नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते . भाविक या दिवशी विधीवत देवी चंद्रघंटाची पूजा करतात.देवीला कमल आणि शंखपुष्पीची फूल अर्पण करतात. देवीच्या कपाळावर घंटाच्या स्वरुपात अर्धचंद्र सुशोभित आहे ज्यामुळे देवी उपासना करणा-या भक्तांच्या चेहर्‍यावरील तेज वाढतं. म्हणून या देवीला चंद्रघंटा म्हणतात.चंद्रघंटा देवीला कमल आणि शंखपुष्पीचे फूल अर्पण करावे. आज तिसऱ्या दिवशी विधीवत देवी चंद्रघंटाची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.   
तसंच देवीला दूध किंवा दूधापासून तयार केलेली मिठाई किंवा खीरीचा नैवेद्य ठेवावा. यामुळे आई आपल्या भक्ताला प्रत्येक कामात यश मिळवून देते.नवरात्रीचा
 तिसरा दिवस दुर्गा देवीच्या चंद्रघंटा रूपाला समर्पित असतो. या दिवशी पूजा करताना भक्तांनी तपकिरी रंगाचे कपडे घातले तर आई चंद्रघंटा प्रसन्न होते.
❤️ देवीचे स्वरूप-
चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरुपाला चंद्रघंटा असे संबोधले जाते. दुर्गा देवीचे चंद्रघंटा स्वरुप कल्याणकारी आहे. चंद्रघंटा देवी दशभुजा आहे.चंद्रघंटा देवीचे वाहन सिंह आहे. या रुपात देवीला दहा हात आहेत. देवीच्या हातात कमळाचे फूल, धनुष्य आणि जपमाळ आणि बाण आहेत. उर्वरित हातांमध्ये त्रिशूल, गदा, कमंडल आणि तलवार आहे. आईचा पाचवा हात अभय मुद्रामध्ये राहतो. देवीच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची एक माळ आहे.

❤️ चंद्रघंटा देवीचे पूजन

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. यानंतर व्रताचा संकल्प करून पूजन करावे. चंद्रघंटा देवीचे पूजन करताना पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची वस्त्रे परिधान केल्यास उत्तम. तसेच चंद्रघंटा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये खीर, बर्फीचा आवर्जुन वापर करावा, असे सांगितले आहे. याशिवाय देवीला मध अर्पण करावा, 

❤️ चंद्रघंटा देवीचा मंत्र

चंद्रघंटा देवीचे पूजन करताना पुढील मंत्र म्हणावा.

" पिण्डजप्रवरारूढ़ा ण्डकोपास्त्रकेर्युता।
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥
या देवी सर्वभूतेषु मां चंद्रघंटा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमो नम:।।"

❤️ चंद्रघंटा देवीची महती

असे सांगितले जाते की, भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधःकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली.या देवीची उपासना, आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते. यासह तिसऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठणामुळे उपासकांना यश, प्रगती, कीर्ती, मान, सन्मान प्राप्त होऊ शकतात, असे मानले जाते.आज तिसऱ्या दिवशी विधीवत देवी चंद्रघंटाची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.   

❤️ देवी चंद्रघंटाची पूजा कशी करावी :-

देवी चंद्रघंटाची मूर्ती असल्यास खूपच उत्तम.पण देवीची मूर्ती नसल्यास फोटोला एका पाटावर ठेवा. त्यानंतर विधीवत देवीची पूजा करा. देवीला कुंकू, अक्षता, धूप, पुष्प आणि दूधापासून तयार केलेल्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर देवी चंद्रघंटाच्या आराधनेसाठी 
“ ऊं देवी चंद्रघंटायै नम: ” या मंत्राचा जप करा. तसेच, दुर्गा चालीसा म्हणावा. दुर्गा आरती केली तरी देवी भक्ताला पावते.

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, ऑक्टोबर ०८, २०२१

मैं हूं ना![ शेलकाव्य ]

प्रिये, तू केलास ग् मनापासून प्लॅन
प्लॅन  खरंच  सुंदर विचारांचा होता
तुला अन् मला कळले नाही ते बेत
बेत फसले ग् भावाचे वाचलो स्वतः

प्रिये,नको करु चिंता घे ध्यानी मैं हूं ना
ना अडवू शकत ग् आपल्या दोघांना !
तू अन् मी दो जिस्म एक जान है हम
हम वो शख्स! न लढता जिंकू सर्वांना  

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

खरंचं...गडे !



आज नवरा म्हणे बायकोला
झाला का ग्ं स्वयंपाक
नसेल झाला तर जाऊ
हॉटेलात जेवायला झाऽऽक !😊

खरंच गडे तुम्ही बोलला
हे कसं सुचलं हो आज ?
सांगा ना गडेऽऽ मला 
दिलदारपणाचं राज !😏

साठी उलटली तरी कधी
सोबत नेलं नाही फिरायला
वेडबिड तर नाही ना लागलं
ह्या माझ्या कंजुस नव-याला 🤔

तो कानाजवळ जाऊन
हळूच काही तरी बोलला
ऐकताच मात्र ती तर
लागली चक्क नाचायला💃

खरंच का हो संसारात
वाढत्या वयात असं घडतं ?
म्हातारे होता होता कोणी
बायकोच्या प्रेमात पडतं ?🤭

अगं,आजपर्यंत तू फक्त…
घरातली कामं करित राहिली
रांधा वाढा अन् उष्टी काढा
स्वतः यातच अडकवत गेली😘

रोजच्या जगण्यात विसरलो 
प्रेमाच्या गुलूगुलू गप्पा आपण
म्हणून डिनर  घेतांना चघळू
पहिल्या दिवसाची गोड आठवण😄

घरात पोरं आणि सुना आल्या
सरली मग आपली प्रायव्हसी
चऽऽल  घराबाहेर लुटू आपण
आपल्या तरुण मनाची वीसी🥰

पोरं आणि सुना आपल्या
बघ,संसारात रमलेत छान !
आत्ता आपणही करु मौजमज्जा
मैं तेरा राजा तू मेरी जान…!😋

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
              म्हसावद

शारदीय नवरात्रोत्सव:रुपदर्शन-ब्रम्हचारिणी

शारदीय नवरात्रोतव: रुपदर्शन- ब्रम्हचारिणी
आजचा हा दुसरा दिवस,दुसरी माळ.आजचे देवीचे रुप 
" ब्रम्हचारिणी " म्हणून ओळखले जाते.
" दधाना करपदमाभ्याम क्षमालाकमंडलू।
देवी प्रसिदतु मयि ब्रम्हाचारिण्यनुमत्तमा।। "
     
     नवशक्तीपैकी ' ब्रम्हचारिणी ' हे दुर्गेचे दुसरे रूप आहे. येथे ' ब्रह्म ' या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. नवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी या मातेची पूजा केली जाते. या‍ दिवशी साधकाचे मन ' स्वाधिष्ठान ' चक्रात स्थिर होते. या चक्रात मन स्थिर करणार्‍याला तिची कृपा आणि भक्ती प्राप्त होते. या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे.
     नवरात्री उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारिणी देवीची पूजा केली जाते. ब्रम्हचारिणी देवीला हिरवा रंग प्रिय आहे. हिरवा रंग विश्वास, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतिक आहे. हा रंग अनेक आजार दूर करू शकतो, असे मानले जाते.
     देवी ब्रम्हचारिणीच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू आहे. तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला त्यावेळी नारदमुनींने तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती. या तपस्येमुळे या देवीला
 " तपश्चारीणी " किंवा " ब्रह्मचारिणी " असे म्हणतात.

एक हजार वर्षापर्यंत देवीने फळे खाऊन तपश्चर्या केली. उपवास काळात देवीला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला होता. या तपश्चर्येनंतर तीन हजार वर्षांपर्यंत केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस काढले. यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला ' अपर्णा ' हे एक नाव पडले.
अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते. तिची ही अवस्था पाहून तिची आई मैना खूप दु:खी झाली होती. तिने तिला या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी '' उमा अगं! नको ग नको!" अशी हाक दिली. तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणीच्या पूर्वजन्माचे '' उमा '' हे एक नाव पडले. तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात हाहाःकार उडाला. सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले. शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले, की '' हे देवी ! आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही. तुझ्या तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे. तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान शंकर तुला पत‍ी रूपात प्राप्त होतील. आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा. लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील.'' असा वर दिला.
" या देवी सर्वभू‍तेषु माँ ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।। "
या पावन मंत्राचा कंठस्थ जप केल्याने भक्तांची इच्छा पूर्ण होते. अशी ही पावक देवी ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे. तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते. देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते. अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप आहे.

(टिप- ही माहिती ऐकीव ,व कथा-किर्तनातून श्रवण केलेली असून या माहितीचा आधारे फळप्राप्तीची कोणतीही हमी लेखक देत नाही.)

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...