वंदन तुजला प्रथमेशा तू सकलांचा अधीपती
देवा तूच रे सुखकर्ता आणिक गणांचा ईशा
कोटीसूर्य तेजे उजळती अखिल विश्वाचा दिशा
देवा तूच रे बुद्धीदाता चौसष्ट कलांचा अधिपती
तूच दावीसी चौदा विद्या देवा झाला कलाधिपती
मुषकावर बैसोणी देवा ब्रम्हांड तूच रे तारितो
भक्तवत्सल होऊन तू दैत्य,असुरासी वधीतो
शिवशक्तीसी वंदून देवा केल्या प्रदक्षिणा तू तीन
ब्रम्हदेव कृपा हस्ते मिळाला पुजेचा आद्य मान
गणांचा होऊन नायक अमृत नाम तुझे गणपती !
©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा