Kaayguru.Marathi

मंगळवार, ऑगस्ट २८, २०१८

रक्षाबंधन.

       रक्षाबंधन
नातं तुझं नी माझं
बहिण अन् भावाचं
रक्षाबंधन सणाला
जपू स्नेह-सौख्याचं   ।।१।।
राखीचा प्रितगंध
दुरदुरी हो  दरवळला
बहिण घरी आज
जणू श्रीहरी आला    ।।२।।
हाती तूझा बांधते
धागा रेशमाचा
त्यात गुंफला मी
प्राण द्रोपदीचा         ।।३।।
कुंकुम अक्षत टिळा
लाविते तुझा कपाळी
लाभो सुख-समृद्धी
दादा तुला सर्वकाळी।।४।।
भाऊ म्हणे बहिणीस
देतो तुला वचन
तुझी ऐकता हाक   
करीन तुझे रक्षण    ।।५।।
प्रा. पुरुषोत्तम पटेल

©

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...