Kaayguru.Marathi

मंगळवार, ऑगस्ट २८, २०१८

श्रीशंकरा

              * श्रीशंकरा *

दारी तुझा आलो मी करुणावतारा

दर्शन दे रे शंभो मज कर्पूरगौरा ||धृ||

देवांचा देव तू रे तू महादेव

तूच शोभे देवा पार्वतीवरा       ।।१।।

दर्शन दे रे शंभो मज कर्पूरगौरा…  

हलाहल विष भोला तूच पचविले

निलकंठ झाला रे तू  जगउद्धारा।।२।।

दर्शन दे रे शंभो…

बेलपान कन्हेर धतूरा तुला आवडे

ॐ नमो ऐकता पावसी ओंकारा।।३।।

दर्शन दे रे शंभो…

तांडव नृत्याचा तू धनी आद्य नर्तक

नर्तनात तूच रमतो हे नटेश्वरा।।४।।

दर्शन दे रे शंभो…

जटा शोभे गंगा माथी चंद्रकोर

रुळे मुंडमाळ गळा भस्म कपाळा।।५।।

दर्शन दे रे शंभो मज

महाकाल नाव  तू काशीअधिपती

भक्त उद्धारक देवा तू विश्वेश्वरा।।६।।

दर्शन दे रे शंभो मज…

नाग तनुवरी विलसे  हाती डमरु

तूच हरितो चिंता नमन चिंतेश्वरा।।६।।

दर्शन दे रे शंभो मज कर्पूरगौरा

© प्रा.पुरूषोत्तम पटेल

म्हसावद ता.शहादा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...