Kaayguru.Marathi
बुधवार, एप्रिल १३, २०२२
रविवार, एप्रिल ०३, २०२२
माझा अभिमान !
देवा...निळकंठा ! हे सगळं तुझ्या कृपेनेच !
जन्माने लाभले मला पुण्यवान आईबाबा
अभिमान वाटतोय मला त्यांचा जगण्याचा
विचारांचे अमृत प्राशून आहे मी ताठ उभा
बायको माझी गुणाची आहे माझा अभिमान
निश्चयाचा महामेरु ती करतेय संसार छान
माझा मुला - मुलीची तर गोष्टच लई भारी
तीघांच्या कर्तृत्वाने वाढला माझा सन्मान !
माझी लेक तर गुणांची माझा अभिमान
पुत्राने उचलला स्वाभिमानाचा संस्कार
धन्य धन्य झालो मी जन्म देऊन दोघां
स्वप्न सुखी जीवनाचे झाले होऽ साकार!
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
मंगळवार, मार्च २९, २०२२
तुला पाहतो
तुझ्यात सर्व दुनिया पाहतो मी
तुव रुपापुढे तुच्छ मला सारे
चांदणेही मग फिके मानतो मी
सुवर्णकांती दिसे दिव्यप्रभा
अनलज्वाला तुझ्यात पाहतो मी
तू हसता गाली पसरते लाली
मुखावर उष:काल पाहतो मी
मुखकमल तुझे मोहवी मज
मुखावरी चंद्र न्याहाळतो मी
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
गुरुवार, मार्च २४, २०२२
देवा,तू माझा श्वास!
देवा... माझा एकेक श्वास
तू दिलेली अप्रतिम भेट !
कृतज्ञ मी जपीन हृदयात
गाईन तुझे अमृतगाणे थेट!
देवा...चालतो मी तुझा बळे
जाणीव मला तू माझ्या श्वास
जिथे जातो तेथे मज होतो
अनंत रुपात तुझाच भास !
देवा... तुज पाहतो रेऽऽ मी
प्रतिदिन पंचपंच उष:काली
पानात फुलात किरणात जलात
पाऊसाचा धारात संधीकाली !
प्रभो ! दयाघना मागणे एक
सदैव असावा तू माझा सांगाती
विसर न व्हावा तुझा कधी
हात घ्यावा हाती दे सन्मती !
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
बुधवार, मार्च २३, २०२२
आई
आई... तुझ्या त्यागाला जगी उपमाच नाही
बाळाच्या सुखकल्याणा तू विसरते सर्वकाही
तुझ्या जिव्हाळ्याचा देवालाही वाटे हो हेवा !
उभा विटेवरी पंढरीनाथ भक्तांची होऊनी आई
आई...तुझ्या ममतेचा भुकेला ग् वैकुंठनाथ
कान्हा होऊन जन्मला तो देवकीच्या पोटी
झाला यशोदेच्या कन्हैया अनुसूयेचा श्रीदत्त
कौसल्येचा होऊन श्रीराम प्रकटला जगजेठी
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
Mhasawad.blogspot.com
रंगोत्सव सांगे लोका !
रंगोत्सवावाच्या गर्दित सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...
-
तंबाखू टाळा, आरोग्य सांभाळा ! मानवी जन्म आणि मिळालेला हा देह आपण प्रत्येकाने सार्थकी लावलाच पाहिजे. परंतु सध्याचा परिस्थितीचा विचार करता म्...
-
म्हसावद, ता.शहादा येथील कुबेर हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय या विद्यामंदिर विषयी कविता माझी शाळा माझी शाळा लळा लाविते बाळा उपदेशाचा ...
-
भारतीय संस्कृतीचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गुरुबद्दल आदर भावना प्रकट करणे होय. " गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्व...
-
देवा... माझा एकेक श्वास तू दिलेली अप्रतिम भेट ! कृतज्ञ मी जपीन हृदयात गाईन तुझे अमृतगाणे थेट! देवा...चालतो मी त...
-
सखी पहाटेच्या त्या दवाने... तन-मन ग् भिजते प्रेमकिरणात न्हाऊनी मुखकमल तुझे फूलते कळी खुलता प्रीतिची हृदय पुष्प दरवळते फुलपाखरू...
-
विठ्ठल माझा गाव विठ्ठल माझा भाव । हृदयी विराजे विठ्ठल माझा ।। विठ्ठल माझा देव विठ्ठल माझी ठेव । अंतरीची तळमळ विठ्ठल माझा ।। विठ्...
-
देवा,तू आहेस फुलात म्हणून दरवळे परिमळ गुंततो फुलात मी रे विसरुन भान सारे देवा तूच आहे पाऊसधारा म्हणून खुलते वसुंधरा नयनी भरतो...
-
क्या कहूॅं मैं। कॉलेज के वो दिन। युग जैसा लगता था। इक दिन तुम बीन। क्या कहूॅं मैं। कॉलेज की वो मौजमस्ती। आप और मैं थे। प...
-
वर्ष २०२४ मधील पुण्यपावन श्रावण मास… श्रावणसरी अंगावर बरसु लागल्या की, मला बालकवी त्र्यंबक बापुजी ठोमरे यांच्या सिद्धहस्त ...
-
राष्ट्रीय गृहीणी दिवस मित्र मैत्रिणींनो आज ३ नोव्हेंबरचा दिवस. हा दिवस आपण भारतीय नागरिक " राष्ट्रीय गृहिणी दिवस " ...