Kaayguru.Marathi

बुधवार, मार्च २३, २०२२

आई

आई... तुझ्या  त्यागाला  जगी  उपमाच नाही
बाळाच्या  सुखकल्याणा तू विसरते सर्वकाही
तुझ्या जिव्हाळ्याचा  देवालाही वाटे हो हेवा !
उभा विटेवरी पंढरीनाथ भक्तांची होऊनी आई

आई...तुझ्या  ममतेचा भुकेला  ग्  वैकुंठनाथ
कान्हा  होऊन   जन्मला  तो देवकीच्या पोटी
झाला  यशोदेच्या  कन्हैया  अनुसूयेचा श्रीदत्त
कौसल्येचा  होऊन श्रीराम प्रकटला जगजेठी

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

६ टिप्पण्या:

  1. खुप सुंदर रचना 👌👌👌✍️✍️✍️🙏🏼

    उत्तर द्याहटवा
  2. आईविषयी अप्रतिम रचनाविष्कार सरजी ✍️✍️🌟🌟🌟

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...