मला आता ना अडकायचे त्यात
तुझ्याशिवाय चालणार वाट मी
मी तमात पेटवेन नवी वात
करावा लागला न् संघर्ष तरी
तरी तसूभर हटनार नाही
मी संघर्षात नवी वाट शोधेन
शोधेन असे मी भव्य-दिव्य काही
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
करावा लागला न् संघर्ष तरी
तरी तसूभर हटनार नाही
मी संघर्षात नवी वाट शोधेन
शोधेन असे मी भव्य-दिव्य काही
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
आश्चर्य झाले त्या दिवशीं
तिरडीवरील आई म्हणाली
काय रे बाळा..!थकलाय ना
थांब जरासा थोडा वेळ
माझे ओझे वाटून दे ना !
का रे बाळा दुखत असेल ना
माझ्या ओझ्याने तुझा खांदा
त्रास होतोय न् तुला...मग
कशाला करतोय तू हा वांधा?
लाडक्या,वेडा की खूळा रे तू
बाळा ! तुला कळत नाही का
अनवाणी चालतांना पायाला
उन्हाचा लागेल ना रे चटका !
बाळा !स्वतःची घे तू काळजी
मी चालले की दुजा जगात
तू सुखी आणि आनंदी रहा
समृद्ध हो की तुझ्या जीवनात !
पुत्रासाठी जगणे आणि मरणातही पुत्राच्याच सुखाच्या विचार करणारी "आई "
🙏🙏🙏
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
म्हसावद
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
रंगोत्सवावाच्या गर्दित सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...