आज एक ऑक्टोबर... जेष्ठ नागरिक दिवस ! आज समाजात जेष्ठ नागरिकांना अनेक कुटुंबांत घृणास्पद वागणूक देण्याचे प्रकार दैनिकातून व दूरदर्शन वरील बातम्यांतून वाचायला-पाहायला मिळतात.हे निंदणीय आहे.शासनाला जेष्ठांचे अधिकार सुरक्षित राहावे.त्यांना माणूस म्हणून जगता यावे.यासाठी कायदे करावे लागावे.यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते ? ज्येष्ठांचा प्रत्येकाने मान-सन्मान राखावा.कारण शिरवाडकरांनी म्हटले आहे…
" आजचे प्रत्येक हिरवे पान …
हे उद्याचे पिवळे पान आहे ! " ही जाणीव प्रत्येकास व्हावी या किमान अपेक्षेने लिहिलेली ही एक कविता !
आज जेष्ठ नागरिक दिन
दिनांक असे एक ऑक्टोबर
मी वंदन करीतो तुम्हा
जोडूनी माझे दोन्ही कर
जेष्ठ तुम्ही आमूचे दैवत
राखीन मी तुमचा मान
संस्कार गंगोत्री मज जणू
सदैव करीन मी सन्मान
विनंती एकच करु नका हो
तारुण्याचा कणभर गर्व
आजची हिरवी पाने
होई उद्याला पिवळीजर्द
जेष्ठ सहवासाचा लाभ
मिळे भाग्यवंता घरा
युगे अठ्ठाविस उभा राहिला
जगजेठी पुंड्याचा दारा
जेष्ठ आजी आणि आजोबा
नातवांची जणू गीता-गाथा
आज शत शत नमन तुम्हा
कृतज्ञ चरणी ठेवितो माथा!
एक विनंती सकलांना
नका विसरु जेष्ठांचे श्रम
सोने-चांदीचा निर्मिला तरी
नका दावू हो वृद्धाश्रम !
© प्रा.पुरूषोत्तम पटेल " पुष्षम् "
म्हसावद